शिवझिरी घाटातील अपघात प्रकरण
आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा
अमरावती,
भाजपा नेत्या Navneet Rana नवनीत राणा मुंबईवरून अमरावतीत पोहोचताच सोमवारी त्यांनी मेळघाट परिसरातील शिवझिरी घाटात झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. संवाद साधत त्यांनी कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. सात्वंना भेटीदरम्यान मेळघाटची मुलगी म्हणून आपली भावनिक ओळख व्यक्त करत नवनीत राणा यांनी कुटुंबीयांशी संवाद साधला. होळीच्या सणाच्या दिवशी अशी दुर्दैवी परिस्थिती ओढविल्याचे पाहून त्या गहिवरल्या. मृतांच्या कुटुंबीयांची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ स्वतःकडून वैयक्तिक आर्थिक मदत दिली. या प्रसंगी त्यांनी जखमींच्या प्रकृतीचीही विचारपूस केली व त्यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Navneet Rana गावकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण मेळघाट परिसरात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली असून पीडित कुटुंबांना त्वरित न्याय व मदत मिळावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे. यावेळी दुर्योधन जावरकर, दिनेश टेकाम, बादल कंचन, निरज मालविय, प्रमोद शनवारे, उपेन बछले, राजेश मांगलेकर,अविनाश काळे, नागेश मुंडे, संतोष ठाकुर, गायत्री धोत्रे, रामदास धोत्रे, वैभव गोस्वामी, आनंद गौर, आसिफ उर्फ राजु, राम हेगडे,निखिल दुरतकर, रोहीत खडके, हर्ष आंबेडकर, बबलु वानखडे आदि गावातील नागरीक उपस्थित होते.