देसाईगंज,
Pimpalgaon Halabi: Elephant stampede तालुक्यातील पिंपळगाव हलबी गावांमध्ये रानटी हत्तींनी शेतकर्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास शेतात शिरलेल्या हत्तींनी धान, मका व इतर पिकांची नासधूस केली. त्यामुळे शेतकर्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकर्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, वनविभागाच्या अधिकार्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच एसीएफ, आरएफओ व वनरक्षकही यावेळी उपस्थित होते. गावकर्यांनी मात्र रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
Pimpalgaon Halabi: Elephant stampede यावेळी माजी सभापती परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परशुराम ठाकरे, भुमेश्वर शिंगाडे, सदानंद दोनाडकर, संदीप धोटे, रोशन मेश्राम, गजेंद्र नाईक, बंडू घरत, देवानंद भोयर, जितेंद्र भोयर, उद्धव घरत, लीलाधर दोनाडकर, रमेश भोयर, हिराजी बालापुरे, हेमराज नाकतोडे, सुरेश बुल्ले, श्रावण पत्रे, कुसन बालापुरे, तिमा बालापुरे, प्रफुल धोटे, नीलकंठ राऊत, सुरज पारधी, रितेश गाडगे, मनोहर बुल्ले, टिकाराम धोटे, गिरीधर चूलपार, शिशुपाल कमल, महेश राऊत, मुखर्जी राऊत, हिरालाल प्रधान आदी उपस्थित होते.