७० वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडाची जाहीर धिंड

02 Mar 2026 14:19:58
पुणे
Laxmi Nagar crime, सोशल मीडियावर चर्चेत आलेला व्हिडिओ आता प्रत्यक्षात पोलिस कारवाईचे प्रतीक बनला आहे. हातात हथकडी, दोरखंडाने जखडलेला आणि पोलिसांच्या कड्या सुरक्षा व्यवस्थेतून नेला जाणारा तरुण म्हणजे सुलतान रेहमान शेख. अवघ्या २० व्या वर्षी २२ गुन्ह्यांची नोंद असलेल्या या आरोपीला पुणे पोलिसांनी जाहीर धिंड काढून कठोर कारवाई केली आहे.
 

Pune gangster Sultan Rehman Sheikh, Laxmi Nagar crime, 
येरवडा परिसरातील लक्ष्मी नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुलतान शेखवर वाहन तोडफोड, दहशत निर्माण करणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नव्याने स्थापन झालेल्या लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहनांची तोडफोड होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.तपासादरम्यान एका तोडफोडीच्या प्रकरणात सुलतानचे नाव पुढे आले. चौकशीत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली. पोलिसांच्या नोंदींनुसार, त्याच्यावर तब्बल २२ गुन्हे दाखल असून, तो एकदाच नव्हे तर ७० वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे स्पष्ट झाले.
लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांनी कठोर भूमिका घेत त्याची जाहीर धिंड काढली. पोलिसांनी “गुंडगिरीला घाबरायचे नाही” असा संदेश देत स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी आधीपासूनच कडक पावले उचलली आहेत. हडपसर, काळेपडळ आणि बिबवेवाडी परिसरातही यापूर्वी अशाच तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून संबंधितांना धडा शिकवला, परंतु काही ठिकाणी गुन्हेगारीचे डोके वर काढत असल्याचे दिसून येते.या कारवाईनंतर लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, गल्लीबोळातील स्वयंघोषित “भाईंना” धडा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0