पुण्याहून दुबई, अबुधाबी विमानसेवा रद्द

02 Mar 2026 14:30:14
पुणे
Pune international flight cancellations, मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रविवारी (दि. १) अबुधाबी आणि दुबईसाठी होणारी चार आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या अचानक झालेल्या रद्दीमुळे पुण्याहून दुबई, अबुधाबी जाणाऱ्या प्रवाशांची नियोजित कामे रखडली आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना खात्री करूनच तिकीट बुक करण्याचे आवाहन केले आहे.
 

 Pune international flight cancellations, 
स्पाइस जेटची पुणे ते दुबई फ्लाइट (क्रमांक एसजी ५१), रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी होणारे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तसेच, एअर इंडिया एक्सप्रेसची पुणे ते अबुधाबी फ्लाइट (क्रमांक आयएक्स २८३), रात्री ९ वाजून ५ मिनिटांची उड्डाणही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय इंडिगोच्या दुबई- पुणे- दुबई फ्लाइट (क्रमांक ६ ई १४८४/१४८३) रात्री १०:३० वाजता येणारी आणि जाणारी विमानेही रद्द करण्यात आली आहेत.विमान कंपन्यांनी प्रवाशांना आगाऊ सूचना दिल्या असून, त्यांना तिकीट परतावा किंवा युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतरच्या पर्यायी तारखांचे उड्डाणाचे पर्याय दिले जात आहेत. विमानसेवा पुन्हा सुरू होताच प्रवाशांना याबाबत कळविण्यात येणार असल्याचे विमान कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.येत्या दिवसांत मध्य पूर्वेतील तणाव स्थितीवर लक्ष ठेवून विमान कंपन्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सतर्क राहणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाआधी तिकीट आणि उड्डाणाची माहिती नक्की करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0