राम मंदिर भव्य शोभायात्रा कार्याचा शुभारंभ

02 Mar 2026 18:06:17
नागपूर,
Ram Mandir पश्चिम नागपूर नागरिक संघ अंतर्गत श्रीराम मंदिर, रामनगर येथे रामनवमी शोभायात्रेच्या नामफलकाचे विमोचन जेष्ठ विधीज्ञ आनंद परचूरे, डॉ. परिणिता फुके, मंदिराचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले आणि विश्वस्त दिपक खिरवडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. गणमान्य नगरसेवक योगेश पाचपोर, विनोद कन्हेरे, धनश्री देशपांडे, वर्षा चौधरी, ऋतिका मसराम आणि विजय होले यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने श्रीराम नवरात्र, हनुमान जन्मोत्सव आणि शोभायात्रा यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले. प्रचंड उपस्थिती असलेल्या युवा, महिला आणि भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
 
Ram Mandir
 
कार्यक्रमाचे व्यवस्थापन उपाध्यक्ष मुकुंद सरमुकद्दम, विश्वस्त अशोक केदार आणि डॉ. हेमांगी अभ्यंकर यांनी केले, संचालन विश्वस्त मृणाल पुराणिक यांनी केले तर आभार उपाध्यक्ष ॲड. राहुल पुराणिक यांनी मानले. Ram Mandir यावेळी मंदिराचे जेष्ठ पदाधिकारी श्रीराम सावरकर, अशोक आग्रे, मदन देशपांडे, दत्तूजी खरे, विनोद जोशी, डॉ. वृषाली शिलेदार आणि सदस्य यशवंत जानवे उपस्थित होते. पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे यांनी हा कार्यक्रम प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविला.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0