राज्यसभा निवडणुकीत तापतं राजकारण 'राऊतांचा दावा'

02 Mar 2026 13:06:23
मुंबई
Sanjay Raut सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. महाविकासआघाडीत राज्यसभेच्या एका जागेसाठी कोणाला उमेदवारी मिळेल, यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दुजोरा दिला असून, शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत वादावरही त्यांनी आपली भूमिका मांडली. तसेच, इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिका स्पष्ट करून शोक व्यक्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 

Sanjay Raut 
संजय राऊत म्हणाले की, “महाविकासआघाडी तीन पक्षांची आहे, पण काम बिघाड होत नाही. एका जागेवरून तीन पक्षांमध्ये सातत्याने चर्चा सुरू आहे. शेवटच्या मिनिटांपर्यंत ही चर्चा चालू राहणार आहे. काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे, हे मला माहित नाही, राष्ट्रवादीतून शरद पवार इच्छुक आहेत, शिवसेना ठाकरे गटातून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होतात. आमच्या पक्षातून राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक आहेत. निर्णय पक्षप्रमुख घेतात, उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.शिंदे गट आणि भाजपमधील वादावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “श्रीकांत शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील वाढता वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही. जय पवार यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे.”संपर्क साधताना संजय राऊतांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील Sanjay Raut  इराण-इस्रायल युद्धावरही चिंता व्यक्त केली. “शाळांवर हल्ले होणे क्रूर कृत्य आहे. भारताच्या मित्राच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला भीती कशी वाटू शकते? पंतप्रधानांनी युद्ध थांबवले पाहिजे आणि या संकटावर शोक व्यक्त करायला हवा. युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील,” असे राऊत म्हणाले.राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली चर्चा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा एकत्रित परिणाम राज्यातील राजकारणात नव्या तापलेल्या परिस्थितीचे रूप घेत आहे.
Powered By Sangraha 9.0