नागपूर,
sbl energy company गरीबीच्या स्थितीत भावा-बहिणीला शिक्षण देणं झालं नाही अन् पैसापाणी नसल्यानं बहिणीचं लग्न पण थाटामाटात करता आलं नाही. नवरा बेवडा निघाल्यानं बहिणीलाच कमावण्यासाठी बाहेरं पडावं लागलं. पण दाेन मुले, सासू-सासरे आणि बेवडा पती असे संसाराचे ओझे ओढत असतानाच तिचा या सिस्टीमनं जीव घेतला. आता आभाळच फाटलं तर ठिगळं लावू कुठे कुठे? अशी वेळ माझ्यावर आली, अशी भावना स्फोटात मृत्यू पावलेल्या गाेपी काेवेची माेठी बहिण कमला हिने व्यक्त केली.
एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या स्फोटात गाेपी काेवे हिचा मृत्यू झाला. कंपनीच्या प्रवेशद्वारावर गाेपीची माेठी बहिण कमला श्रीरामे(रा.चारगाव) ही अगदी खिन्न मनस्थितीत बसली हाेती. तिच्याशी चर्चा केली असता ती म्हणाली की, आम्ही मूळचे तांदुळवाणी गावचे. चार भावंड आणि माेलमजुरी करणारे अडाणी आईवडील. अत्यंत हालाखीची परिस्थितीमुळे पालकांनीएकाही लेकराला फारसे शिकवले नाही. बालवयातच शेतात राबणे किंवा आईवडिलांना आर्थिक मदत हाेईल अशी कामे केली. हालाखीच्या स्थितीत आईवडिलांनी तिचे घाईघाईत लग्न लावून दिले. पती दारुडा निघाला. तिला राेज मारहाण आणि दारु पिण्यासाठी घरातील सामानांची विक्री करीत हाेता. त्यात तिला दाेन मुले झाली.sbl energy company पती आज, उद्या सुधरणार, या आशेवर ती दिवसं काढत हाेती. मी स्वतः एसबीएल कंपनीत कामाला लागली आणि काही दिवसांतच बहिण गाेपीलाही कामावर लावले. जेमतेम मिळणाèया पगारातून दाेन्ही मुलांचे शिक्षण आणि दारुड्या पतीला सांभाळणे, हेच तिच्या नशिबी हाेते. अशाप्रकार कुंठत कुंठत जीवन जगत असतानाच कंपनीत स्फोट झाला आणि गाेपीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्या कुटुंबावर आकाश काेसळले.
...मलाच सांभाळावे लागेल
बहिण गाेपीलासुद्धा मी माझ्या मुलीसारखं सांभाळले. तिच्या दाेन्ही मुलांचा जबाबदारीसुद्धा मलाच घ्यावी लागेल. माझ्या लकरांप्रमाणे तिच्याही लेकरांचा सांभाळ करावा लागेल. राेज बहिणीला घेऊन कंपनीत कामावर येत हाेते, मात्र उद्यापासून गाेपी मला दिसणार नाही, अशी प्रतिक्रिया कमला श्रीरामे यांनी व्यक्त केली.
........