स्मशान होलीकोत्सवात केली व्यसनाची होळी

02 Mar 2026 20:20:02
दोन तास स्वच्छता अभियान
संकल्प फाऊंडेशनचा २० वर्षापासुन निरंतर उपक्रम
 
वाशीम, 
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने २ मार्च रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होळी सणाच्या पार्श्वभूमिवर मोक्षधाम स्मशानभूमिमध्ये 'Shamshan Holikotsav program' स्मशान होलीकोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या आधी तब्बल दोन तास अथकपणे स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमिचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर स्मशान होलीकोत्सवात व्यसनाची होळी करण्यात आली. संकल्प फाऊंडेशनच्या वतीने गेल्या २० वर्षापासून हा उपक्रम अव्याहत व यशस्वीपणे सुरु आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती व स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे.
 
 
shasmshan
 
या 'Shamshan Holikotsav program'  कार्यक्रमात प्रारंभी स्मशानभूमिचा संपूर्ण परिसर खराट्याने झाडून स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर गुटखा, विडी, सिगारेट, तंबाखु, दारु, गांजरगवत, प्लॉस्टीक पन्न्या आदींची होळी पेटविण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे हे वीसावे वर्ष होते. उपक्रमाचे मुख्य आयोजन संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजीयाणी यांनी केले होते. या उपक्रमात अ‍ॅड. सुरेश टेकाळे, राजु धोंगडे, आशिष इंगोले, रवि गुप्ता, विशाल पट्टेबहादुर, हर्षवर्धन टेकाळे, रवि हजारे, विष्णू इंगळे, नवनिर्माण महिला बहूउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा वृषाली टेकाळे, दत्तगुरु बहूउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा रुपाली देशमुख, दिव्यश्री टेकाळे, पत्रकार मनोज जैस्वाल, शंकरराव देशमुख, गणेश डुबे, उमेश कथले, बंडु गव्हाणे, सखाराम भडके, प्रविण इंगोले, प्रदीप पट्टेबहादुर, भगवान वाकुडकर यांच्यासह तरुण मंडळींनी या समाजसेवी उपक्रमात सहभाग घेवून यशस्वीरित्या पार पाडला.
Powered By Sangraha 9.0