अवघ्या 24 तासात अतिदुर्गम बंगाडी येथे नवीन पोलिस मदत केंद्र

20 Mar 2026 19:36:48
भामरागड, 
गुढीपाडव्याचे औचित्य साधत गडचिरोली पोलिस दलाने अवघ्या 24 तासात भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम Bangadi 'Police Help Center' बंगाडी येथे नवीन पोलिस मदत केंद्राची उभारणी केली. या पोलिस मदत केंद्राच्या उभारणीसाठी 1 हजार सी-60 कमांडो, 18 बीडीडीएस टिम, नवनियुक्त पोलिस जवान, 500 विशेष पोलिस अधिकारी व खाजगी कंत्राटदाराने सहकार्य केले. भामरागड तालुक्यातील लाहेरी उपपोलिस ठाण्यापासून 8 किमी व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 2 किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलिस मदत केंद्र बंगाडी मैलाचा दगड ठरेल, असा आशावाद वरिष्ठ अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
 
 
bangali
 
Bangadi 'Police Help Center'  पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 4 जेसीबी, 8 ट्रेलर, 2 पोकलेन, 20 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. सदर पोलिस मदत केंद्रामध्ये पोलिस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 15 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी. पी. मोर्चा, 8 सॅन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत आहे.
 
 
Bangadi 'Police Help Center'  यासोबतच पोलिस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे 3 अधिकारी व 55 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 3, जालना सी कंपनीचे 2 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 192 बटालियन सी कंपनीचे 1 असिस्टंट कमांडंट व 52 अधिकारी, अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 200 कमांडोज तैनात करण्यात आले आहेत. सदर नवीन पोलिस मदत केंद्र उभारणीच्या कार्यक्रमप्रसंगी विशेष पोलिस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उप-महानिरीक्षक अजय कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफच्या 192 व्या बटालियनचे कमांडंट परविंदर सिंग, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलिस अधीक्षक गोकुल राज जी., भामरागडचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते व पोलिस मदत केंद्र बंगाडीचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अकोशपुयाड, इतर अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0