प्रासंगिक. . .
प्रमोद डोरले
indian culture रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये भारतीय संस्कृतीचे दोन शाश्वत आधारस्तंभ आहेत. सांस्कृतिक जीवनाच्या वाटचालीत पडझडीत, विविध आक्रमण कालातील अंधारलेल्या युगात, सत्याचा, धर्माचा, जीवन मर्यादांचा दिव्य प्रकाश दाखविणारे दीपस्तंभ म्हणून ही दोन महाकाव्ये आधुनिक काळातही वैचारिक, तात्त्विक ज्ञानात्मक मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवू शकतात. या दृष्टीने ही दोन महाकाव्ये अक्षर वाङ्मय या कसोटीला पूर्ण न्याय देणारी अशीच आहे. व्यासोच्छिष्ट जगत सर्वम् ही उक्ती आजही सार्थ ठरते आहे. रामायण आणि महाभारत या ग्रंथातील तत्त्वज्ञानाने भारतीय संस्कृतीला नीतिमूल्यांचे, जीवनाच्या शाश्वत, चिरंतन मूल्यांचे अधिष्ठान मिळाले आहे. त्यांतील महन्मंगल आणि उदात्त चारित्र्याच्या गुण संस्कारांमुळे येथील समाजमनाचे पोषण झाले. विकसन झाले. आसेतुहिमाचल पसरलेल्या या देशात सांस्कृतिक एकता निर्माण होऊ शकली. त्याच एकात्मतेच्या जोरावर अनेक भीषण आक्रमणाचे आघात ही संस्कृती पचवू शकली हे जगाने अनुभवलेले सत्य आहे.
सूर्यवंशी इक्ष्वाकू कुळात जन्मलेले प्रभू श्रीरामचंद्र हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. महर्षी श्री वाल्मीकिंच्या दिव्य प्रतिभेतून साकार झालेले हे महन्मंगल चरित्र! व्यक्तिमत्त्व! मानवी जीवनाशी संबंधित असलेल्या सर्व भूमिकांचा परमोच्च उत्तुंग आदर्श म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र! रामराज्याची निर्मिती करणारा आदर्श राजा, वडिलांनी दिलेल्या वचनपूर्तीसाठी सिंहासनावर पडणारे पाऊल दुसèयाच क्षणाला वनातील कंट-काकीर्ण मार्गावर टाकून रघुकुल रीत सदा चली आयी -- प्राण जाय पर वचन न जायी- हा रघुवंशाचा वारसा जोपासणारा आदर्श पुत्र, रावणाने सीतामाईला पळवून नेल्यानंतर व्याकुळतेने, हे सीते! हे सीते म्हणून आक्रोश करणारा, विरहाग्नीत पोळणारा आदर्श पती, सुग्रीवावरील अन्याय दूर करून त्याला योग्य तो न्याय मिळवून देणारा परम मित्र, युद्धात लक्ष्मणाला शक्तीचा आघातामुळे आलेल्या मूर्च्छावस्थेत भावुक होऊन विलाप करणारा ज्येष्ठ बंधू, कैकेयीने अन्याय केलेला असतानाही कौसल्येपेक्षाही तिला अधिक मान देणारा पुत्र, सामान्य वनवासी जीवन जगणाèया गुहाला सन्मानाने मित्र म्हणून स्वीकार करणारा हितैषी, सर्वप्रकारच्या सामर्थ्याने सुसज्ज असलेल्या दानवी, मायावी सामर्थ्याने युक्त आणि प्रत्यक्ष देवांनाही पराजित करणाèया असुर शक्तीचा सहजपणे पराभव करणारा वीराग्रणी नेता, रावणाचा वध झाल्यानंतर मरणान्तानि न वैराणि न मे कृतानिच- चा शत्रुभावना विरहिततेचा मानवधर्माचा मापदंड प्रस्थापित करणारा महामानव आणि अयोध्येला परत आल्याबरोबर आपली मातृभूमी म्हणून तिला वंदन करून ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गात अपि गरियसी’ या श्रेष्ठतम राष्ट्रभक्तीचा आदर्श प्रस्थापित करणारा, पुण्यभूमी धर्मभूमी, देवभूमी भारतमातेचा सुपुत्र अशा अनेक विलोभनीय जीवनादर्शानी विनटलेले असे हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांचे चरित्र!
महर्षी श्री वाल्मीकिच्या दिव्य प्रतिभेतून प्रकट झालेल्या या रामायण महाकाव्याचा, त्यांतील विविध व्यक्तिजीवनाचा प्रभाव विश्वव्यापी आहे. विश्वसंचार करणाèया आपल्या पूर्वजांनी ही रामकथा आपल्या सोबत जगाच्या विविध देशांमध्ये नेली. ते परत आलेत पण जीवनजगण्याचे तत्त्वज्ञान शिकविणारी रामकथा तेथे रुजली - विकसित झाली. त्यांच्याही जीवनाचे एक अविभाज्य अंग झाली. त्यांच्या साहित्यात, आचरणात, समाजजीवनात, राष्ट्रजीवनात, परंपरागत मूल्यांमध्ये विसावली, प्रतिबिंबित झाली. रामकथेच्या प्रभावाने प्रभावित झालेले देश म्हणून आज आपण चीन, तिबेट, सायबेरिया, कांबोडिया (कम्बुज) इंडोनेशिया, इत्यादी अनेक देशांची नावे घेऊ शकतो. रामन् रवागान् म्हणजे रामकथा, रामायण हे त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शन करणारे पाथेय आहे. उदाहरण म्हणून आपण काही उल्लेख पाहू.
सायवेरियातील रामकथेत रिच्छेन पाल्साङ्गो या लेखकाने लोकांना उपदेश करता
ना असे म्हटले आहे की, ओलान-दुर आरव, बोलुग्रासन येरवे रवुमन् देमि, आलिया नागादुम्बा । ओख्यु आमुर सांगुरक्रुवा इंद्रेन, ओम्बागान दूर नेङ्ग उलु शिनुग्युयाई । ओल्ज गुसेल दुर नेङ्ग येसे शिनुग्सेन उ गेम इयरे । ओरिदुमान्गोस उन निगेन रवागान लंगा-दुर आलाग्दासान्’’
म्हणजे -- जनतेच्या नेत्यांनी, महापुरुषांनी क्षुल्लक अशा आनंदात मग्न होऊ नये. विषयलंपट होऊ नये. लोभात पडल्याने व कामवश झाल्याने प्राचीन काळी राक्षसराज रावण लंकेत मारला गेला.
इंडोनेशियातील रामायणाला काकाविन रामायण असे म्हणतात. त्यात श्रीराम भरताला उपदेश करताना म्हणतात- हे भरता! चारित्र्याचे रक्षण कर. राग द्वेष सोडून दे. ईर्ष्या आदि दोषांपासून मन आणि शरीर शून्य कर. अत्याधिक अहंकारापासून स्वतःला वाचव. निंदा करू नकोस. कुलीन घराण्याचा गर्व बाळगू नकोस. हे भरता हाच खरा धर्म आहे व हेच खरे सत्य आहे. श्रीरामाचा उपदेश ऐकून भरत अयोध्येला परत गेला आणि भक्तिपूर्वक राज्य रक्षणात व्यग्र राहिला ‘भरत सिर तमोल-भक्ति मंराक्ष राज्य’. -- अशी ही ब्रह्मांडाला व्यापून असणारी रामकथा संपूर्ण मानव समाजाच्या मनावर अधिराज्य गाजवणारी! मानवी जीवनाचा उद्देश काय? त्याला अर्थ केव्हा आणि कसा प्राप्त होतो. मानवी जीवनात पार पाडाव्या लागणाèया या विविध भूमिकांमध्ये । कर्तव्यनिष्ठेच्या अंतिम मर्यादा कशा व कोणत्या? वरील सर्व मूलभूत प्रश्नांची, हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती यांना साक्षी ठेवून महर्षी वाल्मीकिंनी हा ग्रंथ लिहिला आहे. विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्याचा मर्मग्राही आलेख स्पष्ट केला आहे. रामायणातील व्यक्तिरेखा दशरथ, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीता, हनुमान, वाली, सुगी्रव, विभीषण, रावण, कुंभकर्ण, या व्यक्तिरेखा आणि भक्तिमार्ग प्रदीप असलेली शबरी, मानवी जीवनातील एकेका भावाचे उत्तुंग शिखर आहे. त्यांचे भाव प्रकटनातून वाल्मीकिंनी संपूर्ण मानवी जीवनाचा उत्क्रांतीपटच रेखाटला आहे. या सर्वांच्या भावविश्वाचे मध्य केंद्रक (न्यूक्लियस) मात्र राम आहे. रथचक्राच्या आèयाप्रमाणे सर्व जीवनरेखा या केंद्राशी निगडित आहेत. त्यामुळे सूर्यचिन्हांकित ध्वज पताकेसह इक्ष्वाकू कुळाचा हा जीवनरथ अक्षुण्णपणे, अखंडपणे धावतो आहे.indian culture युगानुयुगे तो धावतच राहणारा आहे. कथा, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण, नवविधा भक्ती, रामायणातीलल व्यक्तिदर्शन, अध्यात्म, तत्त्वज्ञान या विविध आयामातून रामकथेचा हा गजर होतच राहणार आहे. त्यांत आतापर्यंत अनेकांनी सहभाग दिला आहे. स्वतःचा खारीचा वाटा उचलला आहे. रामकथेचा सेतु बांधण्यास मदत केली आहे. संवाद, कथा, कीर्तन, प्रवचनाद्वारा रामायणकथा घराघरापर्यंत, घरातील व्यक्ती व्यक्तींपर्यंत पोहोचविण्याचा अथक व प्रमाणिक प्रयत्न केला आहे.
श्रीराम हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. या दिव्यस्पर्शी जीवन आणि नामस्पर्शाने वाल्याचा महाकवी वाल्मीकि झाला. वानराचा -- नर आणि नराचा नारायण करण्याचे संजीवक सामर्थ्य राम कथेत आहे.
राष्ट्रजीवनातील अत्यंत घातक वळणावरून, नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू समाजाला तारून नेण्याचे दैवी आणि महान कार्य प्रभू रामचंद्रांच्या या जीवनकथेने केले आहे. इतिहास काळात श्री समर्थ रामदास स्वामींनी चाफळला राम मंदिराची स्थापना केली. अंगापूरच्या डोहात फेकून दिलेल्या प्रभू श्रीराम-सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती काढून त्यांची प्राणप्रतिष्ठा चाफळच्या राम मंदिरात केली. ‘सोडविल्या देवकोटी - भूभार फेडिला बळे’ अशा प्रभू रामचंद्रांचा ‘उत्सव मांडीला’ समाजजीवनात ‘राम’ निर्माण झाला. असुरी शक्तीशी प्रतिकार करण्याचे, संघर्ष करण्याचे मनोबल निर्माण झाले त्यातून ‘उदंड’ झालेल्या ‘म्लेंच्छांचे बंड’ महाराष्ट्रापुरते तरी नष्ट होऊन ‘हिंदवी स्वराज्यरूपी’ ‘आनंदवनभुवनाची’ निर्मिती झाली. त्यापुढील काळात ‘हिंदुस्थान’ बळावले आणि झेंडे ‘अटकेपार’ गेलेत.
आजही रामकथेची ही ‘प्रेरणा’ जागृत होणे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय महर्षी वाल्मीकींचे रामायण अपूर्णच आहे असेच म्हणावे लागेल. ही व्यथा स्व. कवी प्रदीप यांनी ‘रामायण’ या चित्रपटात ‘लव आणि कुश’ यांच्या गीत गायनातून प्रकट केली ती अशी की --
‘भारत के सीतओके दुखडे -- जब तक होते दूर नहीं हे राम! तुम्हारी ‘रामायण’ तब तक होती पूर्ण नहीं संपूर्ण नहीं
अयोध्येतील नूतन भव्य राम मंदिरात किती कोटी लोकांनी दर्शन घेतले, किती कोटी रुपयांचा व्यवहार झाला. ‘टुरिझम’ कसे विकसित झाले यापेक्षा हिंदू समाजातील घराघरातील सीतारूपी मातृशक्ती स्त्रीभक्षी आणि ‘जिहादी’ असुरी शक्तींपासून कशी सुरक्षित ठेवता येईल आणि त्यासाठी रावणाचे दहा मस्तके ‘तोडण्याचा’ अतुल पराक्रमाची प्रेरणा कशी मिळेल याचे चिंतन करण्याची आवश्यकता आहे. .... ‘देवदास पावती फत्ते यद्यर्थी संशय नाही’ हा ‘देवा -- सूर’ संग्रमात सिद्ध झालेला, प्रचीतीस आलेला ‘शाश्वत सिद्धांत आहे’.
9860296131