बांगलादेश क्रिकेटमध्ये बदलाचे वादळ; निवड पद्धतीवर नव्याने कठोर कारवाई

20 Mar 2026 21:50:06
ढाका,
bangladesh-cricket : बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा बदल पाहायला मिळत असून, बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) ने निवड समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रणालीअंतर्गत तीन सदस्यीय समितीऐवजी चार सदस्यीय निवड पॅनेल तयार केले जाणार असून, त्यात प्रमुख निवडकर्त्याची (हेड सिलेक्टर) नियुक्तीही केली जाणार आहे. या पदासाठी माजी कर्णधार हबिबूल बशर यांचे नाव आघाडीवर असून, त्यांच्याकडे प्रमुख जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
 
 

bangladesh 
 
 
यावेळी बीसीबीने निवड प्रक्रियेतही बदल करत इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्याचा मार्ग अवलंबला आहे. उपाध्यक्ष फारुक अहमद, क्रिकेट ऑपरेशन्स प्रमुख नजमुल आबेदीन आणि माजी कर्णधार खालिद मशुद यांच्या समितीने उमेदवारांची मुलाखत घेतली. या प्रक्रियेनंतर काही उमेदवारांनी चांगली छाप पाडल्याचे समोर आले आहे. नव्या पॅनेलमध्ये बशार यांच्यासोबत नयीम इस्लाम, नादिफ चौधरी आणि हसीबुल होसैन यांचा समावेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
पूर्वी निवड समितीची नियुक्ती थेट बोर्डाच्या निर्णयावर आधारित केली जात होती, मात्र आता अधिक पारदर्शकता आणि गरजेनुसार बदल करण्यावर भर दिला जात आहे. BCB च्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये नवे धोरण आणि अधिक व्यावसायिकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0