ग्राहकाची फसवणूक
पुलगाव,
Bullion trader: fraud स्थानिक सराफा व्यावसायिकाने ग्राहकाला २४ कॅरेट ऐवजी २२ कॅरेट सोन्याचा गोफ देवून फसवणूक केल्याची घटना गुरुवार १९ रोजी उघडकीस आली. अमित मसराम (३१) रा. रसुलाबाद याने पुलगाव येथील सराफा व्यावसायिक संजय बदनोरे यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी २४ कॅरेटचा १० ग्रॅम वजनाचा गोफ ६४ हजार रुपयांत खरेदी केला होता. त्याचे बिलसुद्धा त्यांच्याकडे आहे.
Bullion trader: fraud फेब्रुवारी २०२६ मध्ये २४ कॅरेट सोन्याचे भाव १ लाख ५६ हजार झाले. अमितला पैशाची गरज पडल्याने तो त्याच दुकानात गोफ मोडण्यासाठी गेला. त्यावेळी व्यावसायिकाने त्याला १ लाख ३९ हजार रुपये देतो, असे म्हटले. अमितने आजचा भाव १ लाख ५६ हजार रुपये तोळा आहे. तुम्ही १ लाख ५० हजार रुपये द्या, असे म्हटले. परंतु, व्यावसायिकाने नकार दिला. यामुळे अमितने दुसर्या दुकानात गोफ दाखविला असता तो २२ कॅरेट असल्याचे कळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पुलगाव ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.