नागपूर,
Dattatray Nagar Garden Nagpur दत्तात्रय नगर गार्डन, दक्षिण नागपूर येथे संत ज्ञानेश्वर कृती समितीच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने संगीतमय पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या प्रसंगी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी नगरसेवक दीपक कापसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच Dattatray Nagar Garden Nagpur भोलानाथ कुचनकर, देवेंद्र बागल, समितीचे अध्यक्ष बबन गांजरे, सचिव दिनेश खुरसाडे, कोषाध्यक्ष लक्ष्मण बालपांडे, पांडुरंग वाकडे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश जिचकार यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमात संगीतमय सादरीकरणातून गुढीपाडव्याचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र