कापूस खरेदीत फसवणूक..!

20 Mar 2026 20:31:07
इलेक्ट्रॉनिक तराजूत रिमोटद्वारे दांडी
अकोला जिल्ह्यातील टोळीचा पर्दाफाश : 14 आरोपी पकडले

आर्णी, 
Fraud in cotton purchase आर्णी तालुक्यातील अंबोडा येथे 11 मार्चपासून अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळीचे कापूस व्यापारी कापसाला बाजारभावापेक्षा 200 रुपये जास्त भाव देऊन कापसाची खरेदी करीत होते. या दरम्यान ते कापसाच्या वजनात इलेक्ट्रॉनिक तराजूत रिमोटद्वारे दांडी मारून फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. अंबोडा येथील रमेश देविसिंग राठोड यांच्या घरी बुधवार, 18 मार्च रोजी कापूस खरेदी करीत असताना कापसाच्या गाठोड्याचे इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजमाप करीत असताना त्याचे वजन खूप कमी येत असल्याने हे खरेदीदार त्यात काहीतरी अफरातफर करीत असल्याचा संशय राठोड यांना आला. कापसाची मोजमाप सुरू असताना त्यांच्यापैकीच एक सादिक नावाचा इसमाकडे एक भुरकट रंगाचा रिमोट घेऊन काहीतरी करताना दिसला. त्याचा संशय आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक दुर्योधन राठोड हे तातडीने तिथे पोचले.
 
 
rimot
 
त्यावेळी त्यांनी त्या काट्यामध्ये असलेली वजनाची तफावत पंचनामा करून पडताळली. त्यावेळी ‘त्या’ रिमोटने वजन कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामध्ये दिलीप घोरपडे यांच्या अंदाजे 65,700 रुपये किंमतीचा 900 किलो कापूस आणि रमेश राठोड यांच्या सुमारे 36800 रुपये किंमतीच्या 500 किलो कापसाची दांडी या भामट्यांनी मारून एकूण 1 लाख 02 हजार 500 रुपयांनी फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच बुधवार, 11 मार्चपासून याच टोळीने याच गावातील अनेक शेतकèयांकडून कापूस घेताना ‘अशीच’ दांडी मारून फसवणूक केली असल्याचे दिसून आले. याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक काट्यात रिेमोटद्वारे दांडी मारून अनेक कापूस उत्पादक शेतकèयांना लुबाडले आहे.
 
 
Fraud in cotton purchase  भामट्यांच्या या टोळीतील आरोपी मोहम्मद वारीस मोहम्मद शेरू (वय 65, बोरगाव मंजू जि. अकोला) याच्यासह बार्शी टाकळी येथील सादिक रसूल हमीद रसूल (वय 36), रेहबरखान रियासउल्लाखान (वय 27), अन्सारखान सालारखान (वय 27), गफ्फार शहा मुख्तार शहा (वय 32), अब्दुल आतिक अब्दुल मजीद (वय 26), अफताब अहेमद कासीम अहेमद (वय 24), शेख जुबेर शेख निसार (वय 22), तारीकखान सखावतउल्लाखान (वय 36), इम्रानखान अहेमदखान (वय 27), मोहम्मद सोएब मोहम्मद नासीर (वय 31), नावेदखान युनुसखान (वय 26), अ. नासीद अ. रशीद (वय 28), सोहेलखान अनीसखान (वय 30) या सर्वांना अटक करण्यात आली.
आर्णी पोलिसांनी कलम 318 (4), 3 (5) अन्वये गुन्हा नोंद केला असून आरोपींनी वापरलेले वाहन व इलेक्ट्रॉनिक तराजू, त्याचा रिमोर्ट व इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार निलेश सुरडकर, उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, मनोज चव्हाण, ऋषीकेश इंगळे, गुणवंत बोईनवाड, सचिन पिसे, योगेश गिरी, नफिस शेख, आकाश गावंडे यांनी यशस्वी पार पाडली.
Powered By Sangraha 9.0