भंगारामुळे दुर्गंधी ! नागरिक त्रस्त

20 Mar 2026 18:49:41
नागपूर,
Government premises शहरातील विविध शासकीय परिसरांमध्ये जुन्या मोटारी, निष्क्रिय वाहने आणि भंगाराचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे उभी असलेली जुनी वाहने पावसाळ्यात पाण्याने भरून राहतात. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती वाढत असून डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. तसेच भंगारातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील वातावरण अस्वच्छ व असह्य झाले आहे.

456
 
 
नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी अशा भंगाराचा तात्काळ हटाव करणे आवश्यक आहे.Government premises याबाबत संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0