नागपूर ,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात “ICRTSET-२०२६” या विषयावरील सहावी आंतरराष्ट्रीय परिषद १७ व १८ मार्च रोजी उत्साहात पार पडली.
उद्घाटन कार्यक्रमाला डॉ. स्मिता वंजारी अध्यक्षस्थानी होत्या, तर डॉ. सचिन उंटवाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. विजय वाढई व डॉ. स्टॅनली विल्सन यांनी मार्गदर्शन केले. Govindrao Vanjari College परिषदेत विविध तांत्रिक सत्रांद्वारे २०० हून अधिक संशोधन निबंध सादर करण्यात आले. ३५० पेक्षा अधिक विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापक सहभागी झाले होते.समारोप प्रसंगी डॉ. सुधीर अकोजवार उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट शोधनिबंधांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सौजन्य मनोज वैराळकर ,संपर्क मित्र