अंजनगाव, चिखलदरा भागात गारपीट व पाऊस

20 Mar 2026 10:42:51
अंजनगाव सुर्जी,
heavy rain in anjangaon सध्या उन्हाचा पारा वाढला असतानाच तीन दिवसांपासून जिल्ह्यातल्या हवामानात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र बघायला मिळाले. गुढीपाडव्याला आणि पूर्वसंध्येला अंजनगाव तालुक्यातील वनोजा बाग, चिखलदरा परिसरात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
 

heavy rain in anjangaon 
 
अचानक आलेल्या या पावसाने सर्वाधिक फटका हा शेतकर्‍यांच्या शेतातली पिकांना बसला आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवाल्याची भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. वनोजा बाग येथे गुढीपाडव्याला लखमाजी महाराज संस्थानवर यात्रा महोत्सव असतो. या दिवसाला अनेक भक्तांचे कार्यक्रम वनोजा बाग येथे असते. या अचानक आलेल्या गारपिटीने भक्तांची मोठी धावपळ उडाली होती.heavy rain in anjangaon चिखलदर्‍यातही अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. तिवसा, अमरावतीसह अन्य तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले.
Powered By Sangraha 9.0