प्राणीसंग्रहालयात पाणघोड्याचा हल्ल्यात पशुवैद्यकीय तरुणी ठार

20 Mar 2026 14:41:49
शिवमोग्गा,  
hippo-attack-during-routine-check-up कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात एका २७ वर्षीय पशुवैद्यकाचा पाणघोड्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. तावरेकोप्पा लायन अँड सफारी प्राणीसंग्रहालयात कर्तव्यावर असताना पाणघोड्याच्या हल्ल्यात या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला.
 
hippo-attack-during-routine-check-up
 
समीक्षा रेड्डी असे या डॉक्टरचे नाव असून ती बंगळूरुची रहिवासी होती. ती प्राणीसंग्रहालयात कंत्राटी पशुवैद्यक म्हणून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११:४५ च्या सुमारास ती एका गर्भवती पाणघोड्याची तपासणी करण्यासाठी पोहोचली. तपासणीदरम्यान ती थर्मल कॅमेरा वापरत असताना पाणघोड्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका गंभीर होता की, घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना कोणतीही मदत करता आली नाही. घटनेनंतर लगेचच तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. hippo-attack-during-routine-check-up मात्र शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौकशीचे आदेशही देण्यात आले असून वरिष्ठ पशुवैद्यक आणि वन अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. त्यांना सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे वन्यजीवांसोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरील धोके अधोरेखित झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0