भारतातील चार महत्त्वाची विमानतळे तात्पुरती बंद

20 Mar 2026 12:37:39
नवी दिल्ली
India airport closures येत्या काही महिन्यांत भारतातील काही प्रमुख विमानतळे रनवे रिपेअरिंगच्या कामासाठी तात्पुरते बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे विमान प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या योजना बदलाव्या लागू शकतात, तसेच काही वेळा विमानांच्या वेळापत्रकात उशीरही होऊ शकतो. प्राप्त माहितीनुसार, या वर्षी विशेषत: जोधपूर, श्रीनगर, पुणे आणि आदमपूर येथील विमानतळांचा या काळात सहभाग आहे.
 

India airport closures 
जोधपूर विमानतळ २९ मार्चपासून २७ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत या विमानतळावरून कोणतेही विमान उड्डाण करणार नाही. यामुळे इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रमुख विमानवाहतूक कंपन्यांनी २८ मार्चनंतरच्या प्रवासासाठी तिकीट बुकिंग थांबवले आहे.श्रीनगर विमानतळाची वेळ वेगळी आहे. येत्या ऑगस्टपासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत काही वीकएंड फ्लाईट्स सुरू राहतील. मात्र १६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत विमानतळ पूर्णपणे बंद राहणार आहे. पुणे विमानतळावरील रनवे डागडुगीसाठी तारीख निश्चित झाली नसली तरी कामाचे नियोजन सुरु आहे. तर आदमपूर एअरबेस वर्षाच्या शेवटी सुमारे आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता आहे.
या विमानतळांच्या बंद India airport closures  राहण्यामागील मुख्य कारण म्हणजे त्यांचा लष्करासाठी असलेला महत्त्वाचा उपयोग. या रनवेवर फायटर जेट्स आणि इतर संरक्षणसंबंधी उड्डाणे होत असल्यामुळे त्यांचे सुरळीत संचालन सुनिश्चित करणे आवश्यक आहे. रनवेच्या देखभालीसाठी हा तात्पुरता बंद आवश्यक असल्याचे लष्कर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.यामुळे प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की, आगामी काही महिन्यांत विमान प्रवासाचे नियोजन करताना या बंदीबाबतची माहिती लक्षात घ्यावी. मार्ग बदलण्याने प्रवासाचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या तिकीटांच्या बुकिंगसाठी आणि उड्डाणाच्या वेळांसाठी आगाऊ तयारी ठेवावी.या बंदीमुळे देशभरातील प्रवाशांमध्ये सजगतेची गरज निर्माण झाली असून, विमान वाहतूक कंपन्यांनीही तदनुसार उपाययोजना सुरू केल्या आहेत. भविष्यातील प्रवासासाठी ही माहिती आवश्‍यक ठरणार आहे, असा सुचक इशारा विमानवाहतूक आणि लष्कर तज्ज्ञांनी दिला आहे.
Powered By Sangraha 9.0