वसंत उद्यान पुनर्निर्माणासाठी 19.90 कोटी मंजूर
पुसदचे ‘वसंत उद्यान’ पुन्हा बहरणार
पुसद,
हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीसाठी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयालगत उभारलेल्या ‘वसंत उद्यान’ पुनर्निर्माण व सर्वांगीण विकासासाठी इंद्रनील नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्याने महायुती सरकारच्या माध्यमातून तब्बल 19 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुसद परिसरातील ‘वसंत’प्रेमी आणि स्थानिक पुसदकरांमध्ये या निर्णयामुळे आनंद व्यक्त होत असून महायुती सरकार व Indranil Naik इंद्रनील नाईक यांच्याप्रती समाधान व्यक्त करीत आहे. वसंतराव नाईक यांच्या अलौकिक योगदानामुळे पुसद शहराला महाराष्ट्रभर सामाजिक ओळख मिळाली आहे. त्यांच्या स्मृतीसाठी पुसद शहरामध्ये वसंत उद्यान निर्माण करण्यात आले.
Indranil Naik पण विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणीमुळे या उद्यानाचे विकासाचे व देखभालीचे काम रखडले होते. पण वसंतराव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करीत महायुती सरकारने राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मागणीचा विचार करून वसंत उद्यानाचा कायापालट करण्यासाठी 19 कोटी 90 लाख रुपये मंजूर करून वसंतप्रेमींना आनंदाची वार्ता दिली आहे. वसंतराव नाईक यांच्या विविध वस्तूंच्या संग्रहालयासह त्यांच्या स्मृती जपण्यासाठी व वसंत उद्यान पुनर्निर्माणासाठी मिळालेल्या या निधीसाठी इंद्रनील नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहे. पुढील कमी कालावधीमध्ये शेती आणि शेतकèयांना केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राच्या विकासाचा शाश्वत पाया घालून देशात अव्वल राज्याचा दर्जा मिळवून देणाèया वसंतराव नाईक यांच्या स्मृतीसाठी उभारलेल्या वसंत उद्यानच्या पुनर्निमानाचे कार्य पूर्णत्वास जावो ही जनभावना सर्वत्र ऐकावयास मिळत आहे.
महायुती सरकारचे आभार
सततच्या पाठपुराव्यामुळे वसंतराव नाईक यांच्या स्मृतीसाठी उभारण्यात आलेल्या या वसंत उद्यानाच्या पुनर्निर्माण आणि सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारने भक्कम निधी दिल्याबद्दल महायुती सरकारचे राज्यमंत्री Indranil Naik इंद्रनील नाईक यांनी आभार मानले आहे.