हदगावात कडूलिंब सालामृत व रससेवन आजपासून

20 Mar 2026 20:53:54
आर्य वैश्य महिला मंडळाचा पुढाकार

हदगाव, 
Kaḍulimb salamrita -ras sevanआर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त व्याधीमुक्त व निरामय आरोग्यासाठी तीन दिवसीय कडूलिंब सालामृत व रस प्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 21 ते 23 मार्च दरम्यान दररोज सकाळी 6.30 ते 7.30 या वेळेत हनुमान मंदिर, कोर्टाजवळ येथे होणार आहे.
 
 
ras
 
(संग्रहित छायाचित्र )
 
या शिबिरात दिग्रस येथील कृषी व्यवसायी, 80 वर्षीय किशोर बनगिनवार मार्गदर्शन करणार आहेत. ते गेल्या 45 वर्षांपासून कडूलिंबाच्या आंतरसालीच्या रसाचे सेवन करत असून त्यातून त्यांना निरोगी जीवनाचा लाभ झाल्याचा अनुभव आहे. हाच अनुभव सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ते 12 वर्षांपासून अशा शिबिरांचे आयोजन करत आहेत. आयुर्वेदात कडूलिंबाला विशेष महत्त्व असून चैत्र महिन्यात नव्या पालवीमुळे त्याचे औषधी गुण अधिक प्रभावी मानले जातात. त्यामुळे या काळात कडूलिंबाच्या आंतरसालीचा रस किंवा पानांच्या रसाचे सेवन केल्यास शरीरातील विविध विकारांवर गुणकारी परिणाम होतो, असे सांगितले जाते.
 
 
Kaḍulimb salamrita -ras sevan शिबिरात कडूलिंबाच्या आंतरसालीपासून रस तयार करण्याची पारंपरिक पद्धतही समजावून सांगितली जाणार आहे. ब्रह्ममुहूर्तावर झाडाला इजा न पोचवता आंतरसाल काढून, त्याचे बारीक तुकडे करून खलबत्यात वाटून त्यात पाणी मिसळून रस तयार केला जातो. त्यानंतर हा रस गाळून त्यात गरम गारगोटीचा चटका दिला जातो. हा रस सकाळी उपाशीपोटी तीन दिवस घेतल्यास रक्तशुद्धी, त्वचारोग, मधुमेह, चक्कर येणे आदी समस्यांवर लाभ होतो, असे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आर्यवैश्य महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0