मालेगाव शहरात दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा !

20 Mar 2026 18:54:10
पाणी टंचाईचे सावट
मालेगाव, 
Kurala Project Water Scheme कुरळा प्रकल्पातून नळ योजनेद्वारा होणारा पाणीपुरवठा हा दुर्गंधीयुक्त असून, अशुद्ध व गाळ मिश्रीत पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोयात येण्याची शयता असून, कुरळा प्रकल्पातील जलसाठा मार्च महिन्यातच संपुष्टात येणार असल्याचे दिसते. त्यामुळे येत्या काही दिवसात मालेगाव शहरात भीषण पाणीटंचाई भासण्याची शयता आहे.
 
 
Kurala Project
 
मालेगाव शहर हे पाणी टंचाईग्रस्त असून, दरवर्षी उन्हाळ्यात शहरात पाण्याची भीषण टंचाई जाणवते. शहरात शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नाही. कुरळा प्रकल्पातून नळ योजनेद्वारे होणारा पाणीपुरवठा अशुद्ध व खराब असताना दरवर्षी उन्हाळ्यात या प्रकल्पातील जलसाठा हा अपुरा पडत असल्याने शहरात पाण्याची भीषण टंचाई भासते. पाणीटंचाई मुळे शहरातील नागरिकांच्या अतोनात हाल होत असताना टँकर द्वारा पाणीपुरवठा करावा लागतो. यावर्षी मार्च महिन्यातच पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. शहरात नळ योजनेद्वारा दुर्गंधीयुक्त अशुद्ध व गाळ मिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने कुरळा प्रकल्पातील पाण्याने तळ गाठला.
 
 
Kurala Project Water Scheme  शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कुरळा प्रकल्पातील अपुरा जलसाठा लक्षात घेता शहरात येत्या काही दिवसात पाण्याची भीषण टंचाई भासण्याची शयता असून, पाणीटंचाईची शयता लक्षात घेता नगरपंचायत प्रशासनाने आतापासूनच तातडीने पाणीटंचाई उपाय योजनेकडे लक्ष दिले पाहिजे तर चाकतीर्थ प्रकल्प योजनेतून असणार्‍या आरक्षित पाणीपुरवठा मालेगाव शहराला करावा, अशी मागणी ही आता नागरिकातर्फे केल्या जात आहे.
 
 
दरवर्षी पेक्षा यावर्षी मालेगाव शहरात मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. शहरात पाण्याचे दुसरे कोणतेच स्तोत्र उपलब्ध नसल्याने नगरपंचायत द्वारा होणार्‍या पाणीपुरवठ्यावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे, अशा परिस्थितीत पाणीपुरवठा बाबत योग्य त्या उपाययोजने साठी तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0