मका पिकाची नुकसान भरपाई त्वरित द्या

20 Mar 2026 18:42:39
चामोर्शी, 
गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे घोट-सुभाषग्राम जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकर्‍यांचे Maize crop damage मका पिकाचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्यासह शेतकर्‍यांनी तहसीलदार घोरुडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
shuresh shaha
 
Maize crop damage चामोर्शी तालुक्यातील ठाकूरनगर, वसंतपूर, सुभाषग्राम, आनंदग्राम येथील शेतकर्‍यांच्या मका पिकाचे अतिवृष्टीने नुकसान झाले. या नुकसानीचे पैसे अद्याप मिळाले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा यांच्याकडे केली असता शहा यांनी लगेच शेतकर्‍यांसह तहसीलदार घोरुडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व त्यांच्याशी शेतकर्‍यांच्या समस्येबाबत चर्चा केली.
 
 
Maize crop damage शेतकर्‍यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर तहसीलदार घोरुडे यांनी संबंधीत तलाठ्यांना तत्काळ बोलावून विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सर्व शेतकर्‍यांना 31 मार्चपर्यंत नुकसान भरपाईचे पैसे मिळतील, असे आश्‍वासन दिले. तहसीलदारांना निवेदन देतेवेळी सुरेश शहा यांच्यासह भाजप नेते विकास मैत्र व ठाकूरनगर, वसंतपूर, सुभाषग्राम, आनंदग्राम येथील ग्रामस्थ उपस्थित होते. सुरेश शहा यांनी शेतकर्‍यांच्या समस्या प्रशासनाकडे लावून धरल्याबद्दल शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0