मनीष मल्होत्राच्या आई गरिमा मल्होत्रा यांचं निधन

20 Mar 2026 12:59:44
मुंबई
Garima Malhotra बॉलिवूडमधील नामांकित फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आई गरिमा मल्होत्रा यांचे निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र ही घटना मनीष मल्होत्रा आणि त्यांच्या कुटुंबासाठी मोठा धक्का ठरली आहे.
 

 Manish Malhotra mother death, Garima Malhotra passing, 
गरिमा मल्होत्रा मुंबईतील त्यांच्या राहत्या घरीच होत्या आणि तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दुःखद प्रसंगानंतर मनीष मल्होत्राच्या कुटुंबाला मित्र आणि सहकारी बॉलिवूड इंडस्ट्रीतर्फे मोठा धीर मिळत आहे.गरिमा मल्होत्रा या मनीषच्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. मनीष अनेकदा मुलाखतीत आणि सोशल मीडियावर आपल्या आईविषयी प्रेमाने बोलत आले आहेत. त्यांच्या मते, आईच्याशिवाय त्यांच्या फॅशन कारकिर्दीतील यश अशक्य झाले असते. लहानपणापासूनच कपड्यांची आवड असलेले मनीष त्यांच्या आईच्या साड्यांपासून वेगवेगळे डिझाइन तयार करत असत, आणि त्याच्या या आवडीला गरिमाने नेहमी प्रोत्साहन दिले.
बॉलिवूडमधील अनेक Garima Malhotra  सेलिब्रिटी मनीष मल्होत्राच्या घरी जाऊन श्रद्धांजली अर्पण करत आहेत. यामध्ये करण जोहर, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, करिष्मा कपूर, वरून धवन, सोनाली बेंद्रे, उर्मिला मातोंडकर आणि फातिमा सना शेख यांचा समावेश आहे. सर्वांनी मल्होत्रा कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला आणि या दु:खद प्रसंगात साथ दिली.मनीष मल्होत्रा यांनी यापूर्वी आपल्या आईविषयी अनेकदा भावनिक पोस्ट लिहिली आहेत. 2019 मध्ये त्यांनी आपल्या वडिलांनाही गमावले होते, आणि त्यानंतर आईसोबत त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. 2024 मध्ये ‘मदर्स डे’ निमित्त त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते, “माझी आईच माझी ताकद, प्रेरणा आणि माझी सर्वात जवळची साथीदार आहे” . या पोस्टमधून मनीषने आपल्या आईबद्दलच्या खोल भावनांचा खुलासा केला होता.गरिमा मल्होत्रा यांच्या निधनाने फॅशन उद्योगातही शोककळा पसरली आहे. मनीषच्या जीवनातील आईनेच त्यांना फॅशन क्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन दिले होते आणि त्यांचा मार्गदर्शन त्यांच्या कारकिर्दीत महत्त्वाचा ठरला. आता या दु:खद घटनेमुळे मनीष मल्होत्रा त्यांच्या आईच्या आठवणीत आणि प्रेरणेत त्यांच्या कामात पुढे जाऊन आपली कारकीर्द अजून अधिक उज्वल करणार आहेत, अशी अपेक्षा आहे.
Powered By Sangraha 9.0