अनिल कांबळे
नागपूर,
dowry थाटामाटात साखरपुडा आटाेपल्यानंतर लग्नाची तारीख काढली. धुमधडाक्यात लग्नाची वधुपक्षाकडून तयारी सुरु हाेती. मात्र, अचानक नवरदेवाने व त्याच्या कुटुंबियांनी हुंड्याची मागणी केली. हुंडा देण्यास नकार दिल्यामुळे नवरदेवाने थेट लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी जरीपटका पाेलिसांनी आई व दाेन मुलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आराेपींमध्ये उमेश नीलकंठ देशभ्रतार (32), निरंजना नीलकंठ देशभ्रतार (52) आणि हर्षल नीलकंठ देशभ्रतार (28) तिन्ही रा. चरडे लेआउट, काटाेल यांचा समावेश आहे. शिवानी वासुदेव बांबाेर्डे (26) रा. आमगाव (जि. गाेंदिया) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.
रिया (काल्पनिक नाव) सध्या नागपूरमध्ये नाेकरी करत असून जरीपटका येथील दयालू साेसायटीमध्ये राहते. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया व उमेश यांचा विवाह ठरला हाेता आणि दाेन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा साखरपुडाही पार पडला हाेता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत हाेते, मात्र अचानक उमेश व त्याच्या कुटुंबीयांचा दृष्टिकाेन बदलला. 22 ते 27 ेब्रुवारी 2026 दरम्यान उमेश व त्याच्या कुटुंबीयांनी लग्न समारंभ रिसाॅर्टमध्येच करण्याची अट घातली. रियाने इतका खर्च करण्यास नकार दिल्यानंतर आराेपींनी 3 लाख रुपये राेख देण्याची मागणी केली.dowry अन्यथा लग्न हाेणार नसल्याचे सांगितले. समजावण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर रियाने जरीपटका पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पाेलिसांनी तिन्ही आराेपींविरुद्ध हुंडाबंदी कायदा 1961 अंतर्गत कलम 4 व 6 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
*********