मोजतबा खामेनेई यांचा पहिला व्हिडिओ समोर...बघा

20 Mar 2026 10:42:53
तेहरान,
Mojtaba Khamenei video इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग या इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमाने एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये मोजतबा खामेनेई दिसत आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये ते काही लोकांसमोर धार्मिक मार्गदर्शन करताना दिसत असून उपस्थित नागरिक त्यांचे भाषण एकाग्रतेने ऐकत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, त्यांचा असा व्हिडिओ प्रथमच सार्वजनिकपणे समोर आल्याचे सांगितले जात आहे.
 
 

Mojtaba Khamene 
 
दरम्यान अली खामेनेई यांच्या निधनानंतर देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची जबाबदारी मोजतबा खामेनेई यांनी स्वीकारल्याचे वृत्त समोर आले आहे. ८६ वर्षीय अली खामेनी यांचा अलीकडेच झालेल्या संघर्षादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेनंतर इराणच्या सत्ताकारणात मोठे बदल घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. याच संघर्षात इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी आणि गुप्तचर विभागाचे मंत्री इस्माईल खतीब यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे इराणमधील राजकीय परिस्थिती अधिकच अस्थिर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0