मनपाचे शाश्वत शहर विकासाच्या दिशेने मार्गक्रमण

20 Mar 2026 11:30:21
नागपूर,
municipal corporations journey नागपूर महापालिका शाश्वत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे महापौर नीता ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘विकसित भारताच्या संकल्पनेत नागपूर शहराचे योगदान’ या विषयावर आयोजित या चर्चासत्रात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.
 

मनपाचे शाश्वत शहर विकासाच्या दिशेने मार्गक्रमण  
 
 
विकसित भारताच्या दिशेने नागपूर शहर ‘रोल मॉडेल’ ठरू शकते, असा आशावादी सूर या आयसीटीआरडी गोलमेज परिषदेच्या चर्चेत उमटला. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण मते मांडली. पुढे बोलताना महापौर नीता ठाकरे यांनी नदी स्वच्छता अभियान, सोलर योजना, जलपुनर्भरण आणि हरित शहर उपक्रम राबवून नागपूरला पर्यावरणपूरक शहर बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘विकसित भारत २०४७’ साकारण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी “विकसित भारतीयातूनच विकसित भारत निर्माण होतो” असे सांगत कौशल्याधारित शिक्षण व स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली.municipal corporations journey माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांनी व्यक्तीतील कल्पकता आणि समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती विकसित भारतासाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
आयसीटीआरडीचे चेअरमन डॉ. आशिष ससनकर यांनी नागपूरला शिक्षण, लॉजिस्टिक, वैद्यकीय, वाहतूक आणि पर्यटन क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगितले. नागपूर ‘ज्ञानकेंद्र’ म्हणून विकसित होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले.
चर्चासत्रात विविध तज्ज्ञांनी नागपूरच्या शाश्वत विकासासाठी लॉजिस्टिक, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज अधोरेखित केली. आधुनिक वैद्यकीय सुविधा, स्टार्टअपसाठी निधी, क्रीडा पायाभूत सुविधा आणि मानसिक आरोग्य यावरही चर्चा झाली. या परिषदेच्या माध्यमातून नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0