सप्तगिरी नगरात गुढीपाडवा उत्साहात साजरा

20 Mar 2026 15:07:06
नागपूर,
Narendra Nagar Nagpur सप्तगिरी नगर, नरेंद्र नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १९ मार्च रोजी परिसरातील मैदानावर सामूहिक गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
 
 
 
sos
 
 
 
या कार्यक्रमात सोसायटीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले .Narendra Nagar Nagpur आनंदमय वातावरणात सण साजरा करण्यात आला.सप्तगिरी नगरमध्ये वर्षभर होलिका दहन, रंगपंचमी, तान्हा पोळा, चैत्रगौर यांसारखे विविध सण सामूहिकरीत्या साजरे करण्यात येतात, ज्यामुळे परिसरात एकोप्याचे वातावरण टिकून राहते.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले
सौजन्य:उदय दिवे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0