संजय राऊत यांची रुपाली चाकणकरांवर टीका

20 Mar 2026 12:01:45
नाशिक
Nashik fake baba case नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यात बुवाबाजी आणि त्याआड होत असलेल्या कथित शोषणाच्या घटनांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. या प्रकरणात राजकीय संबंध उघडकीस येत असल्याने वातावरण अधिकच तापले असून, विविध स्तरांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
 

Nashik fake baba case godman controversy Maharashtra, Sanjay Raut statement, Rupali Chakankar controversy, 
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली. भोंदूबाबाचे पाद्यपूजन करतानाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांनी चाकणकर यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.“रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राहू नये. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल, तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा,” अशी मागणी राऊत यांनी केली. या प्रकरणात वैयक्तिक आयुष्याचा प्रश्न उपस्थित होत नसून, एका महिलेने सहनशक्ती संपल्यानंतर तक्रार दिल्याचा उल्लेख त्यांनी केला. तसेच, तक्रार दाखल होऊ नये म्हणून दबाव आणल्याचेही गंभीर आरोप त्यांनी चाकणकर यांच्यावर केले.
राऊत यांनी पुढे प्रश्न Nashik fake baba case  उपस्थित करत, “रुपाली चाकणकर यांना नेमकं कोण आणि का वाचवतंय?” असा सवाल केला. नाशिकमधील संबंधित भोंदूबाबावर अनेक महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप असताना, महिला आयोगाच्या अध्यक्षा त्या बाबाचे पूजन करत असल्याचे चित्र समोर येणे गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, राज्यात Nashik fake baba case  लागू असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा संदर्भ देत राऊत यांनी कठोर कारवाईची मागणी केली. “ज्यांच्या छायाचित्रांमध्ये किंवा व्हिडिओमध्ये अशा प्रकारचे प्रकार दिसून येतात, त्या सर्वांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले जावेत,” असे ते म्हणाले. महाराष्ट्र अंधश्रद्धाविरोधी लढ्यात अग्रेसर असताना सत्ताधारी पदांवरील व्यक्तीच अशा कृत्यांत सहभागी होत असतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे असून, पुढील काही दिवसांत यावर आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0