संस्कार भारती यवतमाळतर्फे ‘पाडवा पूर्व संध्या’

20 Mar 2026 11:37:46
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
padwa purva sandhya गुढी पाडव्याने प्रारंभ होणाèया नववर्षाच्या पूर्व संध्येला, 18 मार्च रोजी स्थानिक अमृत सेलिब्रेशनमध्ये संस्कार भारती यवतमाळ शाखेतर्फे ‘पाडवा पूर्व संध्या’ हा कार्यक्रम गीत, संगीत, नाट्य, नृत्य, चित्रकला व भू अलंकरण इत्यादी कलाप्रकारांच्या सादरीकरणाने साजरा झाला.
 

padwa purva sandhya 
 
 
यवतमाळ नगर परिषद सदस्य कीर्ती राऊत, भारतीय जनता पार्टीचे यवतमाळ जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार, संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, प्रांत उपाध्यक्ष आनंद कसंबे, यवतमाळ शाखेच्या अध्यक्ष प्राची बनगीनवार व मंत्री कमलेश मुंदेकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले विवेक कवठेकर यांचा तसेच नागपूर येथील खासदार महोत्सवात उत्कृष्ठ रांगोळी साकारल्याबद्दल अरुण लोणारकर, संजय सांबजवार व प्रदीप गज्जलवार यांचा सत्कार करण्यात आला.
  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राची बनगिनवार यांनी केले. कीर्ती राऊत यांनी संस्कार भारतीच्या विविध कार्यक्रमांचा गौरवपूर्वक उल्लेख करून सर्व कलावंतांना शुभेच्छा दिल्या. विवेक कवठेकर यांनी संस्कार भारतीतर्फे देशभर राबविण्यात येणाèया कार्यक्रमांची माहिती देऊन सर्जनशील कडी निर्माण होण्यात या उपक्रमांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.
 
या कार्यक्रमात अनेक सुश्राव्य गाणी व नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती करण्यात आली. विशेषत: सेवा समर्पण प्रतिष्ठानमधील यश गायकवाड व रीमा तोडकर या दिव्यांग कलावंतांनी सादर केलेल्या शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाड्याने उपस्थित प्रेक्षकांना रोमांचित केले. अपर्णा शेलार, कमलेश मुंदेकर, साक्षी काळे, मंथन गादेवार यांनी सादर केलेल्या सुमधुर गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
वादक कलाकार म्हणून सचिन वालगुंजे, श्रेयस धोके व अजिंक्य शिंदे होते. प्रेम निनगुरकर यांच्या चमूने सादर केलेले भक्तीमय नृत्य, शीतल बोंद्रे यांच्या चमूने सादर केलेले नृत्य, दिशा कोठारींच्या चमुचे नृत्य, तर साची भुसार व लोकेश मडावी यांनी गोंधळ नृत्य सादर केले.
 
कार्यक्रमाचे संचालन नाट्यकलावंत ऋषिकेश निवल यांनी केले. आभारप्रदर्शन कार्याध्यक्ष संजय सांबजवार यांनी केले. राजश्री कुळकर्णी, राजू गज्जलवार, अरुण लोणारकर यांनी रांगोळी साकारली.padwa purva sandhya कार्यक्रमासाठी प्रशांत बनगीनवार, डॉ. ललिता घोडे, दत्ता देशपांडे, ताराचंद कंठाळे, निशिकांत थेटे, अनंत कौलगीकर, जीवन कडू, शिल्पा थेटे, डॉ. स्वाती जोशी, चंद्रशेखर सवानेसह संस्कार भारती यवतमाळच्या कार्यकारिणीने परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0