‘पीएम टूर’च्या कामांचे समितीकडून ‘पोस्ट मार्टम’

20 Mar 2026 19:51:23
सा.बा.च्या अभियंत्याचे पितळ पडेल उघडे?
 
वर्धा, 
एएमसी व PM Narendra Modi  पीएम टूरच्या कामात मोठा गैरप्रकार झाल्याची तक्रार बांधकाम विभागाला प्राप्त झाली. याच तक्रारीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या त्रि-सदस्यीय चौकशी समितीने शुक्रवारी स्थानिक स्वावलंबी विद्यालयाचे मैदान गाठून कामांची चौकशी केली. ही चौकशी समिती लवकरच अहवाल कार्यकारी अभियंत्यांना सादर करणार आहे. चौकशीअंती सा.बा.च्या तत्कालीन कनिष्ठ अभियंत्यांची अडचण वाढण्याची शयता वर्तविली जात आहे.
 
 

pm toor
 
शहरातील एका व्यक्तीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता, नागपूर विभागाचे प्रादेशिक मुख्य अभियंता यांना तक्रार सादर करून सावंगी-पालोती-वडद या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती (एएमसी)चे काम, तसेच विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौर्‍यासाठी स्थानिक स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलेल्या विविध कामात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप पुराव्यांसह केला. या तक्रारीची दखल घेत गठीत करण्यात आलेल्या या त्रि-सदस्यीय तज्ज्ञांच्या चमूने शुक्रवार २० मार्चला स्वावलंबी विद्यालयाचे मैदानावर विविध कामांची तपासणी केली.
 
 
दीड वर्षांपूर्वी PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमाद्वारे पी. एम. विश्वकर्मा या महत्त्वाकांशी योजनेचा शुभारंब करण्यात आला. पंतप्रधानांच्या या वर्धा दौर्‍याच्या अनुषंगाने स्वावलंबी विद्यालयाच्या मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम टाकण्यात आला. हेलिपॅड, रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. पण या कामादरम्यान नियमांना डावलत बिटुमेन कार्पेट म्हणजेच रस्ते कामात वापरण्यात आलेला डांबराचा थर केवळ १५ एमएम ठेवण्यात आला. तर जीएसबीची जाडी १० सेमी व बीएमचे काम पूर्ण करण्यात आले नसतानाही कामांचे देयक अदा करण्यात आल्याची तक्रार आहे.
 
 
PM Narendra Modi  सावंगी-पालोती-वडद या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीमध्येही गौडबंगाल झाल्याचाही आरोप आहे. या रस्त्याच्या कामात साईड शोऊल्डर मुरूम भरण्यात आला नाही. तर साईड शोल्डरची लिनींगही करण्यात आली. शिवाय काही ठिकाणी रस्त्यावरील जीवघेणे खड्डे न बुजविता सुमारे १५ ते २० लाखांचे देयक काढण्यात आल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. तक्रारीच्या अनुषंगाने आज त्रि-सदस्यीय तज्ज्ञांच्या चमूने प्रत्यक्ष काम झालेल्या ठिकाणी जात पाहणी केली. समिती आपला अहवाल लवकरच कार्यकारी अभियंत्यांना सादर करणार आहे, असे सा. बा. समुद्रपूर येथील उपविभागीय अभियंता दिलीप हनुमंते यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0