तमिळ भाषा येत नसल्याचे पोलिसांची पंचाईत

20 Mar 2026 12:14:56
अनिल कांबळे
नागपूर, 
nagpur crime news महाराष्ट्रासह अन्य चार राज्यात घराेडी, चाेरी, लुटमार करणाऱ्या चाेरट्याला कळमना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या. चाेरी केलेला माल विक्री करण्यासाठी आणल्यानंतर चाेरट्याला रंगेहात अटक करण्यात आली. दिलीपबाबू रंगन अय्यास्वामी (27) रा. वेल्लाेर, तमिळनाडू असे या आराेपीचे नाव आहे. त्याचा साथीदार बालाजी गाेविंदअप्पा रा. थाटेपल्ली, कर्नाटक हा पसार झाला. या सराईत आंतरराज्यिय चाेराकडून पाेलिसांनी चाेरीचे 3 लॅपटाॅप, 6 महागडे माेबाईल पाेलिसांनी जप्त केले आहेत.
 

nagpur crime news 
 
 
विजय नगर देशी दारू भट्टीजवळ एक व्यक्ती खांद्यावर काळ्या रंगाची बॅग घेऊन माेबाईल व लॅपटाॅप विकण्यासाठी ग्राहक शाेधत असल्याची माहिती ठाणेदार प्रवीण काळे यांना मिळाली. तिथे पाेचलेल्या पथकाने दिलीपबाबू अय्यास्वामी याला ताब्यात घेतले. दरम्यान पथकाने झडती घेतली असता 3 लॅपटाॅप व 6 माेबाईल पाेलिसांनी जप्त केले.nagpur crime news दिलीपबाबूने साथिदार बालाजीच्या मदतीने कळमना, राणाप्रताप नगरातून लॅपटाॅप व एक माेबाईल चाेरल्याची कबुली दिली. परराज्यातील रहिवासी असलेले हे दाेघेही चाेरलेल्या इलेक्ट्राॅनिक गॅझेटची कर्नाटक आणि तमिळनाडूत विल्हेवाट लावत हाेते.
अन् पाेलिसांची झाली पंचाईत
आराेपी दिलीपबाबू अय्यास्वामी हा मूळचा तामिलनाडूचा आहे. तसेच ताे जेमतेम प्राथमिक शाळा शिकलेला आहे. त्याला फक्त तमिळ भाषा येत हाेती. पाेलिस कर्मचारी त्याची चाैकशी करीत हाेते आणि ताे तमिळ भाषेत बाेलत हाेता. दाेघांनाही एकमेकांची भाषा समजत नव्हती. त्यामुळे पाेलिसांची पंचाईत झाली. शेवटी ठाणेदार प्रवीण काळे यांनी तमिळ भाषा येणाèयाचा शाेध घेतला. त्याला पाेलिस ठाण्यात बाेलावले. त्याची दुभाजक म्हणून मदत घेतली. त्यानंतर आराेपींनी दिलेल्या माहितीचे भाषांतर करुन जबाब लिहिण्यात आले.
Powered By Sangraha 9.0