मसाज-स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा पर्दााश

20 Mar 2026 12:04:44
अनिल कांबळे
नागपूर, 
prostitution बेलतराेडी पाेलिसांनी मनीषनगर परिसरात मसाज-स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा पर्दााश करीत महिला आराेपीला अटक केली. तिच्या तावडीतून परराज्यातील दाेन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. साेनम साैरभ अडिगने (28) रा. पंतप्रधान आवास याेजना असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
 

मसाज-स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा पर्दााश 
 
बेलतराेडी ठाण्यांतर्गत मनीषनगर परिसरातील ‘सेव्हन सी वेलनेस स्पा’मध्ये देहव्यापार हाेत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारावर पाेलिसांनी पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. पंटरकडून इशारा मिळताच पाेलिसांनी तेथे धाड टाकली. साेनम ही बाहेरील राज्यांतील गरिब महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलत असल्याचे प्राथमिक चाैकशीत समाेर आले. झडतीमध्ये पाेलिसांना तेथे दाेन पीडित महिलाही मिळाल्या. त्यापैकी एक महिला ओडिशा राज्यातील असल्याचे सांगितले जात आहे.prostitution दाेन्ही महिलांना सुरक्षा व पुनर्वसनासाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाेलिसांनी घटनास्थळावरून राेख 5 हजार रुपये आणि सुमारे 10 हजार रुपये किमतीचा माेबाईल फोन जप्त केला. या प्रकरणी बेलतराेडी पाेलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा 1956 अंतर्गत कलम 4, 5, 7, 8 तसेच भारतीय न्याय संहिता कलम 143(3) अंतर्गत गुन्हा नाेंदविण्यात आला असून आराेपी साेनमला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पाेलिस उपायुक्त, नागपूर शहर तसेच सहाय्यक पाेलिस आयुक्त, अजनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, बेलतराेडी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0