पुणे-नागपूर-हडपसर व मुंबई-नागपूर-मुंबई विशेष गाड्या

20 Mar 2026 21:06:00
नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक गाडीचा विस्तार

नागपूर,
Pune-Nagpur-Mumbai special trains उन्हाळी सट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर-हडपसर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक गाडीचा विस्तार करण्यात आले. या गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 

pune-nagpur
 
Pune-Nagpur-Mumbai special trains रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसारी, गाडी क्रमांक ०२१४१ मुंबई-नागपूर विशेष गाडी आणि ०२१४२ नागपूर-मुंबई विशेष गाडी १९ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान चालविण्यात येणार आहे. दोन्ही गाड्या आठवड्यातून रविवारी व मंगळवारी धावतील. ०१४५७ पुणे-नागपूर विशेष गाडी १५ एप्रिल ते १५ जुलैदरम्यान प्रत्येक बुधवारी पुणे येथून सुटेल. नागपूर-हडपसर विशेष गाडी १६ मार्च ते १६ जुलैदरम्यान प्रत्येक गुरुवारी नागपूर येथून सुटणार आहे. ०१४६९ पुणे-नागपूर वातानुकूलित विशेष गाडी २१ एप्रिल ते १४ जुलैदरम्यान प्रत्येक मंगळवारी आहे. ०१४७० नागपूर-हडपसर वातानुकूलित विशेष गाडी २२ एप्रिल ते १५ जुलैदम्यान प्रत्येक बुधवारी चालविण्यात येणार आहे. ०११३९ नागपूर-मडगाव विशेष गाडीचा १५ एप्रिल ते जुलैदरम्यान बुधवारी व शनिवारी आणि ०११४० मडगाव-नागपूर विशेष गाडी १६ एप्रिल ते १२ जुलैदरम्यान गुरुवारी आणि रविवारी धावेल. मुंबई-नागपूर-मुंबई आणि पुणे-नागपूर-हडपसर या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्र व आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
Powered By Sangraha 9.0