वर्धेत थकीत टॅस धारकांना दिलासा; ५० टक्के सवलत

20 Mar 2026 16:37:37
वर्धा,
relief for tax arrears holders शहरातील थकीत टॅस धारकांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. थकीत करावर आकारण्यात आलेल्या शास्तीमध्ये आता मध्ये ५० टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत तब्बल २ कोटी ४६ लाख ७१ हजार २५४ रुपयांची आहे.
 
 
वर्धेत थकीत टॅस धारकांना
 
 
वर्धा नगर परिषद क्षेत्रातील मालमत्ता धारकांवर नप दरवर्षी कर आकारणी करते. मात्र अनेक मालमत्ताधारक वेळेत कर भरणा करीत नसल्याने त्यांच्यावर प्रतिमाह दोन टक्के प्रमाणे शास्ती आकारण्यात येते. ही आकरणी अधिक असल्याने त्यामधून सवलत देण्यात यावी, अशी मागणी थकीत मालमत्ताधारकांनी केली होती. शास्ती कराची रक्कम अधिक असल्याने त्याचा बोजा मालमत्ताधारकांवर पडत असल्याने कर वसुली वर देखील त्याचा परिणाम झाला होता. परिणामी नपला कर वसुलीचे उद्दिष्ट पुर्ण करताना अनेक अडचणी येत होत्या. नगरपालिकेच्या कर वसुलीवर याचा परिणाम होत असल्याने शासनाने या शास्तीमध्ये सुट द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. तथापि, शासनाने थकीत कर्ज धारकांसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धा नप क्षेत्रातील २८ हजार ४७६ मालमत्ता धारकांवर ७ कोटी १ लाख ९ हजार ७४६ रुपये कर थकीत होता. १९ मे २०२५ अखेरपर्यंत शास्ती कराची ४ कोटी ९३ लाख ४२ हजार ५०८ रुपये थकबाकी होती.
 
मालमत्ता धारकांवर प्रचंड थकबाकी असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर देखील झाला आहे. तसेच मालमत्ताधारकांवर देखील आर्थिक भुर्दंड पडला होता. त्यामुळे शासनाच्या अभय योजनेतंर्गत प्रस्ताव पाठविण्याची सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्याधिकार्‍यांना केली होती.relief for tax arrears holders त्यानुसार नपने १९ मे २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवरील ५० टक्के शास्तीला माफी देण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी अभय योजनेस मान्यता दिली आहे. ही योजना १८ मार्च ते ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0