रेशीमबागेत महिलांची भव्य वाहन रॅली

20 Mar 2026 12:49:23
नागपूर,
Reshimbag Nagpur भारतीय नव वर्ष स्वागत समितीच्या वतीने मराठी नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला रेशीमबाग परिसरात महिलांची भव्य वाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिलांचा उत्साह व सहभाग विशेष उल्लेखनीय होता.रेशीमबाग बगीचा येथून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. परिसरातील विविध मार्गांवरून रॅली काढत ती दुर्गा देवी मंदिर, पाण्याची टाकी परिसर येथे समारोप करण्यात आली.

opo 
 
 
रॅली दरम्यान सहभागी महिलांनी भजन सादर करून वातावरण भक्तिमय केले. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. Reshimbag Nagpur या उपक्रमातून मराठी नववर्षाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.
सौजन्य:कल्पना गडवे ,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0