रूपाली चाकणकर ‘फरार’?

20 Mar 2026 10:30:45
पुणे,
Rupali Chakankar absconding राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरयांच्याबाबत करण्यात आलेल्या एका सोशल माध्यमावरील पोस्टमुळे राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली थोंबरे पाटील यांनी चाकणकर ‘फरार’ असल्याचा उल्लेख केला आहे. नाशिकमधील कथित 'कॅप्टन' अशोक खरात प्रकरणामुळे मागील काही दिवसांपासून चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणात त्यांचे काही छायाचित्रे आणि एक व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात येत असून त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत, सुषमा अंधारे यांसह अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
 

rupali chakankar 
 
दरम्यान, रूपाली ठोंबरे पाटील यांनी केलेल्या पोस्टमध्ये “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा फरार” असा उल्लेख करत उपरोधिक भाष्य केले आहे. या विधानामागचा नेमका हेतू काय, याबाबत विविध तर्क वितर्क मांडले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाकणकर माध्यमांसमोर न आल्यानेच हा टोला लगावला गेला असावा, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे संबंध समोर येत असल्याचेही सांगितले जात आहे. काही कार्यक्रमांतील छायाचित्रांमुळे वाद अधिक चिघळला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून पुढील काही दिवसांत यावर अधिक घडामोडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Powered By Sangraha 9.0