“आम्ही ट्रम्प यांना विचारायचं का?” इराणवरील हल्ल्यानंतर नेतन्याहूंची ठाम भूमिका

20 Mar 2026 12:41:49
जेरुसलेम, 
netanyahu-on-iran-attack इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या चर्चांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रथमच स्पष्ट भूमिका मांडली आहे. इस्रायलने अमेरिकेला या संघर्षात ओढले असल्याच्या आरोपांना त्यांनी नकार दिला आहे.
 
 
netanyahu-on-iran-attack
 
इराणच्या साउथ पार्स वायू क्षेत्रावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “खरंच कोणाच्या मनात असा विचार येऊ शकतो का की आम्ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून काय करायचे ते ठरवू?” या हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना आधी माहिती देण्यात आली होती का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नेतन्याहू यांनी सांगितले की, इस्रायलने ही कारवाई स्वतंत्रपणे केली आहे. netanyahu-on-iran-attack तसेच ट्रम्प यांनी पुढील हल्ले थांबवण्याचा सल्ला दिला असून, इस्रायल त्याचे पालन करत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
या संघर्षाची सुरुवात फेब्रुवारीच्या अखेरीस झाली, जेव्हा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईनंतर इराणमधील सर्वोच्च नेत्यावर मोठा हल्ला झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव अधिक वाढला. netanyahu-on-iran-attack त्याच वेळी अमेरिका आणि इराण यांच्यात अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू होती. मात्र, अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिस्थिती बिघडली आणि संघर्ष उफाळून आला, अशी चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणात इस्रायलने अमेरिकेला जबरदस्तीने ओढले असल्याचा दावा फेटाळला आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात समन्वय आहे आणि निर्णय विचारपूर्वक घेतले जात आहेत. तसेच, त्यांनी इराणच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत संघर्षाची जबाबदारी इराणवर असल्याचे संकेत दिले आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर अमेरिकेतही मोठी चर्चा सुरू आहे. अमेरिका या युद्धात का सहभागी झाली आणि त्यात इस्रायलची नेमकी भूमिका काय आहे, यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या राजीनाम्यानंतर या चर्चेला अधिक वेग मिळाला आहे. त्यांच्या मते, इस्रायल आणि काही प्रभावशाली घटकांच्या दबावामुळे अमेरिका या संघर्षात ओढली गेली, अशी टीका त्यांनी केली आहे. मात्र, या आरोपांवर अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघर्षाबाबतची चर्चा आणि तणाव कायम आहे.
Powered By Sangraha 9.0