वर्धा,
teachers behavior शिक्षण देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनींशी घृणास्पद वर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात एका नव्हे तर चार विद्यार्थिनींसोबत अशा प्रकारचे गैरवर्तन केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाविरुद्ध अल्लीपूर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत पीडित विद्यार्थिनी चौथीत शिकत आहे. दीपक नावाचा शिक्षक त्याच शाळेत विद्यार्थ्यांना शिकवतो. पीडित विद्यार्थिनीसह तिच्या आणखी चार मैत्रिणीही त्याच शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षणाच्या बहाण्याने आरोपी शिक्षक या विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन करत होता. हा प्रकार फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होता. अखेर त्रस्त झालेल्या पाचही विद्यार्थिनींनी शाळेच्या तक्रार पेटीत तक्रार केली. या तक्रारीत शिक्षकाने केलेल्या ‘बॅड टच’चा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. ही तक्रार मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ बैठक बोलावून प्रकरणाची गंभीर दखल घेतली. शिवाय चौकशी सुरू केली.teachers behavior संबंधित विद्यार्थिनींची चौकशी करून जिल्हा परिषद शिक्षण विभागालाही माहिती देण्यात आली. यानंतर मुख्याध्यापकांनी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांसह अल्लीपूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे १८ मार्चला सायंकाळी आरोपी शिक्षक दीपक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपास अल्लीपूर पोलीस करत आहे.