कार अपघातात तीन आयआयटी विद्यार्थ्यांचा मृत्यू

20 Mar 2026 12:47:31
अनिल कांबळे
नागपूर, 
car accident मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन आयआयटी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नागपूर येथील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. हा अपघात भातान बाेगद्याजवळ घडला. लय देशभ्रतार (वय 20, रा. लघूवेतन काॅलनी, ग्रामीण पाेलीस मुख्यालय राेड, नागपूर), ओमकुमार बाेरसे (वय 23, रा. नाशिक) आणि श्रेयांश शर्मा (वय 22, रा. जयपूर) अशी अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
 

कार accident  
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही विद्यार्थी त्यांच्या मित्रांसह दाेन वेगवेगळ्या वाहनांतून गुरुवारी पहाटे 5 वाजता पवई येथील आयआयटी मुंबई कॅम्पसमधून खंडाळा येथे सूर्याेदय पाहण्यासाठी गेले हाेते. परतीच्या प्रवासादरम्यान सकाळी सुमारे 8.45 वाजता पनवेलपासून सुमारे 10 किलाेमीटर अंतरावर त्यांची कार अचानक अनियंत्रित हाेऊन उलटली. या अपघातात तिघेही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने कामाेठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्राथमिक तपासणीतच डाॅक्टरांनी तिघांनाही मृत घाेषित केले. नागपूरचा लय देशभ्रतार हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हाेता. ताे अभ्यासात अत्यंत हुशार हाेता.car accident नुकताच साेमवारी ताे आपल्या आई-वडिलांना भेटून नागपूरहून परतला हाेता. ताे आयआयटीमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेत हाेता. त्याच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लय देशभ्रतार याचा अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी सुमारे 9.30 वाजता वैशाली नगर घाट, पांचपावली येथे करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0