नागपूरचे दाेन युवक मध्यप्रदेशातील अपघातात ठार

20 Mar 2026 12:54:04
अनिल कांबळे
नागपूर, 
accident मध्यप्रदेशातील बगलामुखी मंदिरातून देवदर्शन करुन नागपूरकडे परत येत असलेल्या कारला भरधाव तवेरा कारने धडक दिली. हरदा जिल्ह्यात गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात नागपुरातील दाेन तरुण ठार झाले तर दाेघे गंभीर जखमी आहेत. जखमी दाेघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भाेपाल येथे हलविण्यात येत आहे. शुभम जयस्वाल आणि पारस कनाेजिया अशी अपघातात ठार झालेल्या नागपुरातील युवकाचे नाव आहे.
 
 
नागपूरचे दाेन युवक मध्यप्रदेशातील अपघातात
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैतूल-हरदा जिल्ह्याच्या सीमेवरील ढेकना गावाजवळ हर्रई परिसरात सकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. नागपूरमधील सदर परिसरातील अमन जयस्वाल (वय 26), जतिन कनाेजिया (34), पारस कनाेजिया आणि शुभम जयस्वाल हे चाैघे उज्जैन येथील नलखेड़ा येथील बगलामुखी मंदिरात दर्शन करून परत नागपूरकडे येत हाेते. यावेळी त्यांची कार अचानक अनियंत्रित हाेऊन पलटी झाली. पाेलिसांच्या प्राथमिक तपासात कार चालकाला झाेपेची झिंग आल्यामुळे हा अपघात झाल्याचे समाेर आले आहे. अपघातानंतर मागून येणाèया एका तवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी (रा. कल्याणपूर, बैतूल) यांनी तत्परता दाखवत जखमींना कारमधून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने चारही जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.accident या अपघातात शुभम आणि पारसचा रुग्णालयात पाेहाेचण्यापूर्वीच मृत्यू झाला. अमन जायसवाल याच्या हाताला फॉक्चर झाले आहे. तर जतिन कनाेजिया यांची प्रकृती गंभीर असून त्यांना प्राथमिक उपचारानंतर भाेपाल येथे पाठविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0