जिल्ह्यात अवकाळी पाऊस गारपीट विज पडून शेतकर्‍याची हरभर गंजी जळाली

20 Mar 2026 20:07:20
बुलढाणा, 
Unseasonal rain जिल्ह्यात दि. १९ मार्च रोजी दुपारी व रात्री अचानक विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बुलढाणा चिखली मेहकर, लोणार तसेच मोताळा व नादूंरा तालुक्यात या पावसाने बहर आलेल्या अंब्याचा मोहर तसेच लहान आंबे गळून पडाले. कांदा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. मोताळा तालुक्यात एका शेतात विज पडून दिड एकरातील हरभरा व गहू पिकाची सुडी जळून खाक झाली. लोणार तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचंड गाारपीट झाली. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.
 
 
rain
 
Unseasonal rain  बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. देऊळगावराजा येथे झालेल्या पावसाने द्राक्ष टरबूज, मिरची भाजीपाल्यांचे नुकसान झाले. विजांच्या कडकडाटामुळे विज पूरवठा खंडित करण्यात अला मोताळा तालुक्यातील पिंप्री गवळी येथे गहू, हरभरा, मका शेतात पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. देऊळगावराजा तालुक्यातील वझर, खुरमपूर, किणी, देऊळगाव कुडफळ यासह इतर गावात पावसाने हजेरी लावली. या नुकसानीचा सर्वे करावा अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0