1 एप्रिलपासून काम सुरू करण्याचे आश्वासन
मारेगाव,
Variety Mardi Selections: Chakkajam postponed वणी मार्डी वडकी या दरम्यान मार्डीजवळ असलेल्या फिस्की जंगलामध्ये अरुंद असलेल्या रस्त्याची साईड पट्टी भरण्यात यावी, याकरिता शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेले होते. परंतु करण्यात आलेले काम हे थातुरमातुर असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने शुक्रवार, 20 मार्चला जंगलाजवळच मच्छिंद्रा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. शिवसेनेतर्फे मारेगाव तहसीलदारांना 2 फेब्रुवारी 2026 ला फिस्की जंगलातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साईड पट्ट्या त्वरित भरण्यात याव्या, यासाठी निवेदन देण्यात आले होते. या साईडपट्ट्या त्वरित न भरल्यास याविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारासुद्धा या निवेदनातून देण्यात आलेला होता.
शिवसेनेच्या या इशाऱ्यानंतर बांधकाम विभागाने जंगलातील साईडपट्टी भरण्याचे काम केले. परंतु हे काम थातुरमातुर असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला. या विरोधात हे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलन वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या रांगा लागलेल्या होत्या. या आंदोलनावेळी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता केतन परतानी, नायब तहसीलदार विजय मत्ते, ठाणेदार श्याम वानखेडे आणि कनिष्ठ अभियंता सूरज महल्ले यांनी चक्काजाम आंदोलनाला भेट दिली. यावेळी या अधिकाèयांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.
Variety Mardi Selections: Chakkajam postponed या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर, संघटक संजय आवारी, जिल्हा महिला संघटक उज्ज्वला चंदनखेडे, जीवन डाखरे, प्रवीण बलकी, प्रशांत भंडारी, प्रशांत राऊत, अनिल राऊत, दर्शना कुमरे, संगीता टोंगे, कुळसंगे, महेश मुसळे, श्याम कुमरे, प्रमोद शेळकी, तुमराम, सुनील पाळोदे, कवडू मत्ते, संजय वडसकर, पंढरी ताजने, बाळा बरडे, प्रशांत गाडगे, निखिल कालेकर, विकास वैद्य, ब्रह्मदेव जुनगरी, मुकिंदा निवल, गोपी बावणे, सोमेश्वर गेडेकर, तेजस कापसे, शुभम ठावरी, कार्तिक नेहारे, गोविंद निखाडे, पंकज खिरटकर, राजू खिरटकर, दिगंबर नावडे, गणेश आसुटकर यांच्यासह अनेक आंदोलन उपस्थित होते.