अनिल कांबळे
नागपूर,
gudi padwa pahat संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समिती आणि विघ्नहर्ता याेगनृत्य परीवारार्ते दत्तात्रयनगर उद्यानात ‘गुढीपाडवा पहाट’ कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. सुनील आणि पथकाने सुरेल आवाजात भक्तीगीते आणि भावगीते सादर करुन श्राेत्यांची मने जिंकले. संत ज्ञानेश्वर उद्यान कृती समितीचे अध्यक्ष डाॅ. बबनराव गांजरे आणि समितीच्या सदस्यांनी गुरुवारी गुढीपाडवा पहाट कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. मराठी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत महिला व पुरुष सदस्यांनी आपली संस्कृती जपत कार्यक्रमाला हजेरी लावली.
विघ्नहर्ता याेगनृत्य परीवारातील सदस्यांच्या एकजुटीने, मेहनतीने व उत्स्फूर्त सहकार्यामुळे ‘गुढीपाडवा पहाट’ हा संगीतमय मराठी नववर्ष स्वागत साेहळा अत्यंत भव्य, दिव्य आणि दिमाखदार पद्धतीने यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाच्या यशामागे कृती समितीच्या प्रत्येक सदस्याचा माेलाचा वाटा आहे. कलाकारांनी आपल्या अप्रतिम सादरीकरणातून कार्यक्रमाची रंगत सादरीकरणांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि संपूर्ण साेहळा अविस्मरणीय बनवला.gudi padwa pahat या कार्यक्रमाला गिरीश पांडव,अतूल लाेंढे, नगसेवक संजय महाकाळकर, दीपक कापसे, नगरसेवक बाबाराव तायडे आणि नगरसेवक शकील पटेल यांची उपस्थिती हाेती. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता डाॅ. बबनराव गांजरे, महादेव ताेंडरे, दिनेश खुरसाडे लक्ष्मण बालपांडे, विनाेद लुटे,दत्ता सरागे, मनाेहर महाकाळकर, निशिकांत मामीडवार, महेंद्र शिरसागर, नागेश जैन, एम. डी. भाेयर, तानाजी कडवे, भारत ठाकरे, भागवत वऱ्हाडे, जयंत जगताप, रमेश काकडे, अॅड. कांबळे, त्र्यंबकराव महाकुलकर व प्रमाेदराव इंगळे उपस्थित हाेते.