“ट्रम्प यांना कोण समजावणार?” नेतान्याहूंचा टोला; इस्रायल-इराण संघर्ष धोकादायक टप्प्यावर

20 Mar 2026 09:19:13
नवी दिल्ली,
israel iran conflict इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी अमेरिकेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
 
 
israel iran conflict
 
 
पत्रकार परिषदेत अमेरिकेला युद्धात ओढल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना नेतान्याहू यांनी उपरोधिक शैलीत म्हटले, “डोनाल्ड ट्रम्प यांना काय करायचं हे कोणी समजावून सांगू शकतं, असं तुम्हाला खरंच वाटतं का? ते नेहमीच अमेरिकेच्या हितासाठीचे निर्णय घेतात.” त्यांच्या या वक्तव्याकडे उपहासात्मक टिप्पणी म्हणून पाहिले जात आहे.
अमेरिकेच्या लष्करी शक्तीला मोठा फटका
एका अहवालानुसार, या संघर्षात अमेरिकेच्या लष्करी क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत सुमारे १६ लष्करी विमाने नष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दहा अत्याधुनिक MQ-9 Reaper ड्रोनचा समावेश असून, हे इराणच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे पाडण्यात आल्याचा दावा आहे. तसेच, कुवेत येथे चुकून मित्र राष्ट्रांच्या सैन्याकडून अमेरिकेची तीन F-15 Eagle लढाऊ विमाने पाडली गेल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अपघात आणि हल्ल्यांमुळे वाढले नुकसान
या संघर्षात तांत्रिक बिघाड आणि ‘फ्रेंडली फायर’मुळेही मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एक KC-135 Stratotanker इंधन टँकर हवेतच स्फोट होऊन त्यातील सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.israel iran conflict याशिवाय, सौदी अरेबिया मधील एका लष्करी तळावर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात आणखी पाच टँकर विमानांचे नुकसान झाले आहे.
मध्यरात्री पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला
दरम्यान, इस्रायली लष्कराच्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास इराणने पुन्हा मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यानंतर जेरुसलेम, मध्य इस्रायल आणि वेस्ट बँक भागात सायरन वाजू लागले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
संघर्ष आणखी चिघळण्याची भीती
सध्याची परिस्थिती पाहता हा संघर्ष आणखी भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असल्याने जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत गंभीर मानला जात आहे.
Powered By Sangraha 9.0