इराणच्या गॅस केंद्रांवरील हल्ल्यांनी जग ऊर्जा संकटाच्या उंबरठ्यावर

20 Mar 2026 10:08:29
तेहरान,
world is onbrink of an energy crisis इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने आता अधिक गंभीर वळण घेतले असून त्याचा थेट परिणाम जागतिक ऊर्जा व्यवस्थेवर होताना दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेली ही चकमक सुरुवातीला लष्करी कारवायांपुरती मर्यादित होती, मात्र आता ती ऊर्जा स्रोतांपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे.इराणच्या दक्षिण भागातील 'साउथ पार्स गॅस फील्ड'च्या जगातील सर्वात मोठ्या वायू साठ्यांपैकी एकावर हल्ला झाल्याने मोठे नुकसान झाले. या कारवाईला प्रत्युत्तर देताना इराणने कतारमधील इराणने रास लाफान औद्योगिक शहराच्या महत्त्वाच्या वायू केंद्राला लक्ष्य केले. या भागात आग लागली असली तरी ती लवकरच नियंत्रणात आणण्यात आली. हा परिसर 'नॉर्थ डोम गॅस फील्ड म्हणून ओळखला जातो आणि जागतिक वायू पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
 
 
world is on brink
 
या दोन्ही ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक देशांचा औद्योगिक आणि आर्थिक गाडा या वायू पुरवठ्यावर अवलंबून असल्याने या संघर्षाचे पडसाद जगभर उमटण्याची शक्यता आहे. भारतासाठीही ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. भारत आपल्या वायू गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून असून एकूण आयातीत जवळपास चाळीस टक्के वायू कतारमधून घेतला जातो. त्यामुळे या भागातील अस्थिरतेमुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.होर्मुझच्या सामुद्रधुनी महत्त्वाच्या समुद्री मार्गावरील तणाव आणि वायू क्षेत्रांवरील हल्ल्यांमुळे तेलाच्या दरात तीव्र वाढ होऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. काही अंदाजानुसार, कच्च्या तेलाचे दर मोठ्या उंचीवर जाऊ शकतात.युद्धाला तीन आठवड्यांहून अधिक काळ उलटला असला तरी त्याच्या समाप्तीचे कोणतेही संकेत सध्या दिसत नाहीत. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा क्षेत्रावर या संघर्षाचे दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता अधिक गडद होत आहे.
Powered By Sangraha 9.0