तालुका शिक्षण विभाग समावेशित शिक्षणांतर्गत ‘अलर्ट’
यवतमाळ,
यवतमाळ पंचायत समितीच्या समग्र शिक्षा शिक्षण विभाग विद्यमाने समावेशित शिक्षण 2025-26 अंतर्गत Yavatmal Zilla Parishad School यवतमाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्व मुख्याध्यापकांचे समावेशित शिक्षण अंतर्गत एक दिवसीय मुख्याध्यापक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, 20 मार्चला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे करण्यात आले. या मुख्याध्यापक प्रशिक्षणात तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या 150 मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसुविधा, सामाजिक सुरक्षा, समावेशित शिक्षण संकल्पना, दिव्यांगत्व प्रकार व प्रतिबंधक उपाय, प्रत्येक दिव्यांग मुल शिकले पाहिजे, यासाठी एकदिवसीय मुख्याध्यापक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या समावेशित शिक्षण प्रशिक्षणाचे उद्घाटन डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, केंद्रप्रमुख दत्तात्रय गावंडे, निशांत परगणे, सुदर्शन बोरकर, प्रीती ओरके यांची उपस्थिती होती. यावेळी प्रास्ताविक सुदर्शन बोरकर यांनी केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर यांनी, प्रत्येक दिव्यांग मूल शिकू शकते. प्रत्येक मूल हे राष्ट्राची संपत्ती आहे व त्यांचे रक्षण करणे प्रत्येक शिक्षकाचे कर्तव्य आहे असे विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रप्रमुख दत्तात्रय गावंडे यांनी दिव्यांगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे, असे सांगितले.
Yavatmal Zilla Parishad School यावेळी तालुक्यातील जिप शाळांच्या 150 मुख्याध्यापकांनी समावेशित शिक्षणाचे धडे घेतले. या प्रशिक्षणासाठी विजय पातोडे, संजय पातोडे, वर्षा भूतनेर, वैशाली खरवडे, वेदज्योती बोरकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी आभार प्रीती ओरके यांनी मानले. याप्रसंगी विशेष सहकार्य अशोक राऊत, सारंग भटुरकर, कैलास गव्हाणकर, स्वप्निल फुलमाळी, शरद घारोड, राजहंस मेंढे, महेश जनबंधू, सुनील राठोड, मीना सांगळे, नदीम पटेल, अनिल जयस्वाल, विजय ढाले, अनिल खासरे, संजय काळे, अविनाश बनसोड, मिलिंद देशपांडे, अनिता वèहाडे, मीनाक्षी लोखंडे, विनोद शिंदे, नम्रता बिरे, मोरेश्वर पुंडशास्त्री, संजय वनकर या मुख्याध्यापकांचे लाभले.