पाळीव मांजर मेल्याने युवतीची आत्महत्या

20 Mar 2026 15:39:26

suicide due to cat death
 
हैदराबाद,
Young woman commits suicide हैदराबादमध्ये एका तरुणीच्या मृत्यूच्या घटनेमुळे मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पाळीव मांजरीच्या निधनानंतर दुःखात आणि नैराश्यात गेलेल्या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार, वीस वर्षीय या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एक मांजरीचे पिल्लू दत्तक घेतले होते. त्या पाळीव प्राण्याशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला होता. मात्र अल्पावधीतच त्या मांजरीचा मृत्यू झाला आणि या धक्क्याने ती पूर्णपणे खचली. त्यानंतर ती एकटी पडल्याची भावना तिला सतावत होती. कुटुंबीयांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. काही काळानंतर घरातच तिची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आले. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0