पाणी पिण्याच्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला

20 Mar 2026 11:47:41
अनिल कांबळे
नागपूर,
water dispute घरासमाेर पाणी पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका 23 वर्षीय युवकावर पाच जणांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी युवकाच्या तक्रारीवरुन यशाेधरानगर पाेलिसांनी या प्रकरणी तीन आराेपींना अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख मुस्तिफज शेख पवाज (23, माजरी झाेपडपट्टी, मदीना मशीद मागे) आणि त्यांच्याच वस्तीत राहणारा आराेपी आसिफ अली शाैकत अली (51) यांच्यात 16 मार्च राेजी सायंकाळी शेख यांच्या घरासमाेर पाणी पिण्याच्या कारणावरून भांडण झाले हाेते.
 
 
water dispute
 
या भांडणाचा राग मनात धरून आसिफ अली याने आपले साथीदार मुकद्दस शेख शरीफ (29, माजरी झाेपडपट्टी), सुीयान समीर शेख (19, निजामुद्दीन काॅलनी) आणि इतर 2 विधीसंघर्षग्रस्त बालकांना घटनास्थळी बाेलावून घेतले. या पाच जणांनी संगनमत करून शेख यांना अश्लील शिवीगाळ करत हातबुक्कीने मारहाण केली. वाद विकाेपाला गेल्यावर आराेपी मुकद्दस शेख शरीफ याने मुस्तिफज शेख यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने रस्त्यावर पडलेला एक माेठा दगड त्यांच्या डाेक्यात मारून त्याला गंभीर जखमी केले. रक्ताच्या थाराेळ्यात पडलेल्या शेख मुस्तिफज याला तातडीने मेयाे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून यशाेधरानगर पाेलिस ठाण्यात आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिसांनी या प्रकरणातील आराेपी आसिफ शैकत अली, मकद्दस शरीफ आणि सुीयान शेख या तिघांना अटक केली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0