वृद्धाविरुद्ध पोक्सो गुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

21 Mar 2026 19:51:28
बुलढाणा
Buldhana पालकांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ७० वर्षीय वृद्धाविरुद्ध पोसो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
pocso
याबाबत फिर्यादीने दि. १९ मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन शहर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. दरम्यान ७० वर्षीय आरोपी, हा बुलढाण्यातील एक व्यापारी असून तो पीडित मुलीच्या व त्याच्या घरच्यांच्या ओळखीचा असल्यामुळे पीडित कुटुंबामध्ये पूर्वीपासून येणं-जाणं असल्याने विश्वासाचे नाते होते. Buldhana मात्र याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलगी एकटी असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित मुलीनेही हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. दरम्यान आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
Buldhana दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच अशा घटनांमध्ये पीडितांनी न घाबरता त्वरित पालक व पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 
Powered By Sangraha 9.0